शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 42

 मराठी आकलन उतारा
 परिच्छेद क्रमांक 42 



मध्य प्रदेशातील सर्तपुर जिल्ह्यात एक खेडे आहे खजुराहो, खजुराहो मधील मंदिरे ही प्राचीन काळापासून जगप्रसिद्ध आहेत. निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली आणि मंदिरावरील प्रतिभा संपन्न कलाविष्कारांनी नटलेले असे हे ठिकाण आहे. येथील मंदिरे डोंगरदऱ्यांमध्ये तसेच नदीकाठी बांधली गेली आहेत. कंदारीया महादेव मंदिर हे खजुराहो आवारातील एक देखणे मंदिर आहे. स्थापत्य शास्त्रीय दृष्ट्या व भव्यतेच्या बाबत श्रीनाथ, कौशिकनाथ, आणि औरुनाथ ही व अन्य देखणी मंदिरे लहान सहान आकारात पहावयास मिळतात. श्रीनाथ हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले आहे. महादेवाची अनेकविध रूपे कल्पकतेने मांडली आहेत. महादेवाची भव्य मूर्ती व चकचकीत काळ्या पाषाणातील महादेवाच्या पिंडीची स्थापना- 16 व्या शतकात केली असे अभ्यासक सांगतात. खजुराहो मधील कंदारीयासारखी मंदिरे अनेक दैवी चमत्कार घडवून आणणारी आहेत. असे पारंपारिक उद्धृत केले आहे. कौशिकनाथ, औरुनाथ. ही पारंपारिक पद्धतीची व पूर्वीय पद्धतीची बांधलेली आहेत. स्थापत्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैविध्यता पहावयास मिळते. आठ चमत्कार आणि बारा भव्य मूर्तींनी आज जगभरात गाजलेले हे ठिकाण आहे. कौशिकनाथ मंदिरात ऋषभदेव, शिव, विष्णू , पार्वती, बालगणेश यांच्या हजारो मूर्ती आहेत तीन शुभ्र छत्र्या, प्रभामंडप आणि भव्य दिव्य कोरीव काम केलेले सिंहासन हे या मंदिरातील आकर्षण ठरते. कौशिकनाथ मंदिरात पाश्चिमात्य स्थापत्याचा काही प्रमाणात प्रभाव जाणवतो. महादेवाची बारा फुटांची उंच उभी मूर्ती या मंदिराच्या मध्यावर आहे. याच्या भिंतीवर महादेवासंबंधीत अनेक कथा व त्यातील पात्रे दगडात कोरलेली आहेत.

 प्रश्न :

१) कंदारिया मंदिर ……… या राज्यात स्थापित आहे.

१) खजुराहो.

२) सर्तपूर. 

३) मध्य प्रदेश.

४) कंदारीया राज्य.

२) शिवलिंगाची स्थापना झाली. ….

१) इसवी सन पंधराशे एक ते सोळाशे दरम्यान.

२) इसवीसन सोळाशे एक ते सतराशे दरम्यान.

३) इसवी सन 1701 ते 1800 मध्ये.

४) बाराव्या शतकात .

३) कौशिक नाथ मंदिराचे वैशिष्ट्य नाही. ….

१) सिंहासन.

२) प्रभामंडप.

३) छत्री.

४) येशूचे शिल्प.

५) प्रतिभा म्हणजे …….

१) चैतन्य रूप.

२) नक्कल.

३) प्रतिमा.

४) प्रतिबिंब.

५) युरोपियन शिल्पशैली पहावयास मिळते. ……

१) महादेव मंदिरात.

२) औरुनाथ मंदिर.

३) श्रीनाथ मंदिर.

४) कौशिकनाथ मंदिरात.




उत्तरे : १) 3 , २) 1 , ३) 4 , ४) 1 , ५) 4 .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...