मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक 61
हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित निवारा मिळतो. केवलादेव घन अभयारण्य या नावानेही हे प्रसिद्ध आहे. घन म्हणजे घनदाट अभयारण्य अशा अर्थाने हा शब्द वापरला आहे. राजस्थानमध्ये भरतपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य वसलेले आहे. या अभयारण्याला केवलादेव असे नाव पडण्यामागेही एक कारण आहे या अभयारण्याच्या मध्यभागी शंकराचे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावरून केवलादेव अभयारण्य असे नाव पडले. या अभयारण्याचा विस्तार तुलनेने छोटा आहे. 29 किलोमीटर एवढ्याशा जागेत पक्षांच्या तीनशे प्रजाती आढळून येतात. या परिसरात 11 किलोमीटरचा भूभाग हा दलदल युक्त आहे. तर उरलेला भाग गवताळ आणि डोंगराळ प्रदेशाचा आहे. या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी, पर्यटकांच्यासाठी आकर्षक ठरणारे हे पक्षी सायबेरिया, मध्य आशिया या प्रदेशातून आलेले असतात. संपूर्ण हिवाळ्यात या पक्षांचे हे निवासस्थान असते. त्यानंतर हे विनीच्या हंगामात परत जातात. स्थलांतरित पक्षांमध्ये बदके, क्रौंच, पेलीकन, सौरस, गीस, गरुड, राखाडी बगळे, घारी, वटवाघुळे , पाणकोंबड्या, चिमणीसारखे दिसणारे पक्षी, फ्लाई कॅचेर्स म्हणजे उडता उडता कीटक टिपणारे पक्षी असे अनेक विविध जातीचे पक्षी तिथे हिवाळा ऋतूत मुबलक पाहायला मिळतात.
प्रश्न :
१) प्रस्तुत परिच्छेदात वर्णन कशाचे आहे?
१) राजस्थानचे.
२) केवलादेवाचे.
३) भरतपूरचे,
४) विहंगम अभयारण्याचे.
२) अकरा किलोमीटरचा भूभाग दलदल युक्त आहे. कारण …..
१) पक्षी अभयारण्य दलदलीचे असतात.
२) तेथे डोंगर व गवताचा अभाव आहे.
३) ती एक पाणथळ चिखलयुक्त जागा आहे.
४) तेथे पक्षांच्या तीनशे प्रजाती आढळतात.
३) अभयारण्यात पक्षांना सुरक्षित निवारा मिळतो. कारण …..
१) ते एक अनुपयुक्त अभयारण्य आहे.
२) तेथे शिकायला लोक जात नसावेत.
३) तो दलदलीचा प्रदेश असावा.
४) निसर्गतः ठिकाण पक्षाना रहाण्यासाठी उपयुक्त असावे.
४)भरतपूरहून केवलादेवला जाऊन यायला किती कालावधी लागतो?
१) दोन किलोमीटर.
२) सांगता येत नाही.
३) चार मैल.
४) चार हजार मीटर.
५) ‘ राखाडी बगळे' यात अधोरेखित वर्ण समूहाची जात कोणती असावी?
१) रंग,
२) नाम.
३) विशेषण.
४) वर्ण.
उत्तरे : १) 4 , २) 3 , ३) 4 , ४) 4 , ५) 3 .