शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

मराठी भाषा आकलन उतारा परिच्छेद क्रमांक ३२

 मराठी भाषा आकलन उतारा

 परिच्छेद क्रमांक ३२


भीमाशंकर हे सदाहरित अभयारण्य आहे. पुणे – नाशिक रस्त्यावरील मंचरपासून ६५ किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे. तिथे भीमाशंकराचे प्राचीन हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे. गाभाऱ्यात भीमेची पाषाणमूर्ती अन् महादेवाची पिंड आहे. या पिंडीखालून भीमा नदीचा उगम होतो. ही या अभयारण्याची जीवनदायिनी आहे. याच नदीवर चासकमान येथे धरण बांधले आहे. हीच भीमा पंढरपूरला चंद्रभागा बनते.

भीमाशंकर मंदिरापासून एक रानवाट खेड तालुक्यात भोरगिरीला उतरते. वाटेत गर्द हिरवीगार झाडी आहे. किर्र झाडझूडप, त्यांना विळखा घालणाऱ्या अजस्त्र वेली आहेत. या वेली आणि वनस्पतीत औषधी गुणधर्म आहेत. झाडांवर काळतोंडी वानरे धुडगूस घालताना दिसतात. अधिक बारकाईने झाडांच्या शेंड्याकडे पाहिल्यास तर त्यावर पानांची गोल घरटी दिसतील. टुर्रुप टुर्रुप असा आवाज कानावर येईल. त्याचे नाव शेकरू ( जायंट स्क्विरल) भीमाशंकरच्या अरण्यात बिबळे, वाघ, सांबरे, भेकरे आहेत. उदमांजरे, रानडुक्करे आहेत. पिसुरी हरणे, तरस, मुंगूस, खवलेमांजर असे खूप प्राणी आहेत.


प्रश्न :

१) भीमाशंकर येथील वनस्पतींचे वैशिष्ट्ये आहे की –

१) छोट्या व विरळ, २) वैद्यक क्षेत्रास उपयुक्त, ३) अजस्त्र विळख्याची झाडे, ४) विषारी वनस्पती असलेली झाडे.

२) अभयारण्य म्हणजे एक –

१) गर्द अरण्य, २) खूप प्राणी असलेले अरण्य, ३) सुरक्षित जंगल, ४) शंकरदेव प्राण्यांची रक्षा करतो ते ठिकाण.

३)उताऱ्यात किती प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे. –

१) दहा २) अकरा, ३) बारा, ४) तेरा.

४)महादेवाच्या पिंडीखालून जन्म होतो.-

१)भीमदेवाची, २) एक नद, ३) चंद्रभागेची, ४) भीमा नामक सरितेची.

५) चासकमान आहे एक –

१)उगमस्थान, २) खाऱ्या पाण्याचा समुद्र, ३) बांध, ४) सरोवर, 

६) खालीलपैकी अहिंस्र प्राणी कोणता?

१) वाघ व सांभर, २) मुंगूस, ३) उदमांजर, ४) पिसुरी हरणे.

७) टुर्रुप आहे एक –

१) शेकरूचे घर, २) शेकरूचे नाव, ३) जायंट स्क्विरल, ४) रव.



उत्तरे : १) 2 , २) 3 , ३) 3 , ४) 4 , ५) 3 , ६) 4 , ७) 4 .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...