रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 44

 मराठी आकलन उतारा
 परिच्छेद क्रमांक 44 



जीवकांनी आपल्या गुरुची आज्ञा एकनिष्ठपणे पाळली. त्याने प्रत्येक रोपट्याचे व त्याच्या प्रत्येक भागाचे बाळकाईने निरीक्षण केले. त्याने पानांचे, फुलांचे, फळांचे, बियांचे, कंदांचे, सालींचे आणि सर्व अवयवांचे निरीक्षण केले. त्याने त्यांची मुळे सुद्धा विचारात घेतली. परंतु औषधी उपयोग नव्हता अशा कोणत्याही वनस्पतीचा कोणताही भाग त्याला मिळू शकला नाही. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तो कित्येक मैल चालला. जवळजवळ दोन आठवडे त्याने शोध घेतला. ते रोपटे मिळाल्याशिवाय तो आपल्या गुरूंकडे जाऊ शकत नव्हता. तो शोधत राहिला. शेवटी त्याच्या गुरूंनी त्याला परत बोलावले. “ठीक आहे जीवका, तुला काय सापडले?”

 “ गुरुदेव मला क्षमा करा परंतु मी तुमची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, मी अपयशी ठरलो. मी वेगवेगळी शेकडो रोपटी पाहिली. मी शेकडो मैल चाललो. परंतु काही उपयोग झाला नाही प्रत्येक वनस्पतीच्या प्रत्येक भागामध्ये मला औषधी गुणधर्म आढळून आला.”


 प्रश्न :

१)जीवक शोधत होता. …

१) गुरुजींना हवे असणारे औषधी रोप.

 २)औषधी गुणधर्म असणारी झाड.

 ३)औषधी नसणारे झाड.

४) औषधी मुळे.

 २) जीवकाने बारकाईने पाहिले नाही. …

१) फांदी.

२) साल.

३) पान.

४) झाडाखालची माती.

 ३) जीवकाने निरीक्षण केले……

१) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत.

 २) एक दिवस पूर्ण.

 ३)आठवडाभर.

४) पूर्ण एक पक्ष.

 ४) जीवकानी भटकंती केली होती. …..

 १) शंभर किलोमीटर.

२) 160 किलोमीटर.

 ३) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत .

४) निश्चित सांगता येत नाही.

 ५) जडी याला उतार्यात आला आहे. …..

 १) बिया.

 २) फुल.

 ३) फांदी.

 ४) मूळ. 

६) वरील परिच्छेदातून जाणवते की….

  १) जीवक मूर्ख आहे.

 २) जीवकाचे गुरु अज्ञानी आहेत.

 ३) औषधी वनस्पतींची जीवनाने जीवकाने हत्या केली. 

४) कृतीयुक्त ज्ञानर्जन.



उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 4 , ४) 4 . ५) 4 , ६) 4 .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...