मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 46
सेमरवॉटर हे शहर सेमरवॉटर या सरोवरात रूपांतरित झाले आहे. आणि पाण्याखाली खूप खोल चीरनिद्रा घेत विसावले आहे एकेकाळी या सेमरवॉटर सरोवराच्या काठी एक भव्य शहर नांदत होते. तेथील राजाचा वैभवशाली मनोरा, राणीचे लतागृह आणि तटावर पहारा देणारे पहारेकरी होते. एके दिवशी एक लंगडा, दुःखी व अन्नाअभावी दुर्बल व्याकुळ झालेला भिकारी अन्नाच्या आशेने राजाच्या शहरात आला, परंतु तेथील लोकांनी त्याला खाऊ न घालता हाकलून लावले. त्याने दूर दरीतील एका गुराख्याचा त्याने दरवाजा थोटावला. आणि त्या लोकांनी त्याला प्रेमाने आपल्या अन्नातील ओटकेक व मद्य दिले. त्या भिकाऱ्याने संतापून शहराला शाप दिला. परिणामी त्या शहराचे रूपांतर सेमरवॉटर या सरोवरात झाली. आणि ते गर्विष्ठ शहर पाण्याखाली अंधारात चिरनिद्रा घेत कायमचे राहिले.
प्रश्न :
१) सेमर वॉटर होते….
१) एक गाव,
२) तळे.
३) पवित्र शहर.
४) गर्विष्ठ नगर .
२) एक लंगडा दुखी व भिकारी होता. …..
१)उपाशी.
२)देवदूत.
३) परीक्षा घेणारा यक्ष.
४) गुराखी.
३) अन्नाच्या आशेने आलेल्या त्यांना लोकांनी. ……
१) जेवण दिले.
२) प्रेमाने वागवले.
३) पांगवले.
४) आमंत्रित केले.
४) ओटकेक व मद्य देणारे होते. …….
१) मत्सरी.
२)वाईट वृत्तीचे लोक.
३)दयाळू.
४) क्रूर.
५) निधन या अर्थी उताऱ्यात आला आहे. …..
१) भिकारी.
२) वैभवशाली नसलेले.
३) गर्विष्ठ.
४)चीरनिद्रा.
६) राणीच्या निवासाचे वैशिष्ट्य म्हणजे …….
१) तेथून सरोवर पाहता येई.
२) लता नावाचे तिचे घर होते.
३) सुंदर वेलींनी वेढलेले होते.
४) ते तटावर होते.
उत्तरे : १) 4 , २) 1 , ३) 3 , ४) 3 , ५) 4 , ६) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.