प्रत्येक पिल्लाला त्याच्या वजनाइतके मासे रोज लागत. ती मोठी खादाड होती. खंड्या खाडीवरून, नदीवरून मासे पकडून आणता आणता दुबळा झाला होता. हे जेव्हा तिच्या लक्षात आले. तेव्हा ती देखील जवळपासच्या डबक्यातून मासे, बेडकी आणि खेकड्याची पिले धरुन आणी, कधी टोळ तर कधी तुडतुडे पकडी. पिल्लांना नुकतेच पंख फुटू लागले होते. ती बिळाच्या रुंद तोंडाशी बसून आपल्या आई-बापाची वाट पाहत असत. कधी ती मासा घेऊन येई, कधी ती चोचीत खेकड्याच जिवंत पिल्लं घेऊन येई.
एकदा खेकड्याचे पिल्लू तिने पिलापुढे ठेवले. तसा तो खेकडा बिळात तुरुतुरु धावू लागला. तशी ती पिल्ले घाबरली. त्याला कोणीच चोच लावेना. तेव्हा त्यांची आई मदतीला धावली. तिने खेकड्याला चोचीने मारले. तेव्हा कुठे त्या पिल्लांना खायला चोची पुढे केल्या. नाना प्रकारचे भक्ष्य कसे खावे याचे जणू ती त्यांना धडे देऊ लागली.
एकदा त्यांच्या आईने बहिरी ससाणयाची सावली व कर्कश आवाज ऐकला. तिने पिल्लांना बिळात रेटले. व स्वतः देखील घाबरून आत आली. कारण ससाणा हा त्यांचा शत्रू होता.
प्रश्न :
१) तिने पिल्लांना बिळात रेटले, कारण –
१) पिल्ले बिळातून बाहेर जाणार होती.
२) ती धाडसी होती.
३) ससाणा त्यांना खाऊन टाकेल.
४) ससाण्याची सावली त्यांवर पडेल.
२) खंड्या दुबळा झाला कारण –
१) माशांचे वजन वाहून.
२) त्याची मादी खादाड होती.
३) त्याने उपोषण धरले होते.
४) पिल्लांना अन्न पुरवताना त्याला उपोषण घडे.
३) पिल्लांचे अन्न नव्हते. –
१) खेकडे,
२) मासा,
३) बेडूक,
४) ससाणा.
४) पिल्ले घाबरण्याचे कारण होते. –
१) मासे,
२) पिल्लांची आई,
३) खंड्या,
४) खेकड्याचे जिवंत पिल्लू.
५) ‘ दुबळा ‘ या पदबंधाचा उताऱ्यात अर्थ आला आहे. –
१) दीन
२) गरीब .
३) अशक्त.
४) धष्टपुष्ट.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 4 , ४) 4 , ५) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.