Marathi bhasha utare
परिच्छेद क्रमांक ३
मार्तंड मंदिर हे सूर्याला अर्पण केलेले जमिनीवरील पंचमहाभूतांचे उगमस्थान. जम्मू मधील अनंतनाग पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. आठव्या शतकात इसवी सन ७२५ ते इ. स. ७५६ मध्ये बांधले गेले. जम्मूच्या राजा राणादित्याने ते बांधताना चायनीज, गंधारन, गुप्त, जापनीज व ग्रीक स्थापत्याचा अभ्यास करुन बांधले. ३२ एकर आवारात २२० फूट लांब व ४० फूट उंच व ८४ खांबावर उभारलेले उत्तर भारतातील एकमेव मंदीर आहे. मंदिरातील खांबावर व भिंतीवर देखणी व प्रभावशाली शिल्पशैली पहायला मिळते. शिल्पात भारतातील नद्या स्त्री रुपात सूर्याला अर्घ्य वाहत आहेत. असे कला अभ्यासकांना वाटते. अर्थातच नद्या, सूर्य, वायु, पाषाण ही निसर्गाची मूळ रुपे आहेत. हिंदू देवतांची काल्पनिक पण अत्यंत सुरेख व त्रिमिती रचनेत मांडलेली शिल्पे लक्ष वेधून घेतात. खांबावरील नक्षीकाम, कोरीवकाम, भौमितिक आकार तसेच आर्य कालीन भाषा व आडव्या उभ्या रेषांमधून टिंबाच्या नक्षीदार रचना असलेल्या आकृती या मार्तंड सूर्य मंदिरात पहायला मिळतात.
प्रश्न :
१) मार्तंड मंदिर अर्पण केले आहे?
१) परमेश्वररुपी मानवास. २) राणादित्यास. ३) सूर्य देवाला ४) पंचमहाभूतास.
२) मंदिरातील शिल्पात शिल्प नसावे. –
१)सूर्यदेवता. २)भारतातील नद्या. ३)वायुदेवता. ४) येशू ख्रिस्त.
३) सूर्य मंदीर बांधले गेले.-
१) आठव्या शतकाच्या पूर्वार्धात. २) आठवे शतक संपताना. ३) सातव्या शतकात. ४) इसवी सन ७५० ते इ. स. ८२५ मध्ये.
४) सूर्य मंदीर बांधताना वापरली न गेलेली शैली.-
१) गुप्त व जापनीज. २) ग्रीक व चायनीज. ३) गांधारण व गुप्त. ४) इराणी व इजिप्तशियन.
५) मंदिरात कोणत्या लिपीतील अक्षरे पहायला मिळतील.-
१)ग्रीक. २) गंधारण. ३)आर्यकालीन. ४)जापनीज.
६) आठव्या शतकात शिल्पकारांना ज्ञान होते.-
१) इस्लामिक तत्वज्ञानाचे. २) मंदिरातील भूतांचे. ३) भूमितीविषयक संकल्पनांचे. ४) युरोपियन संस्कृतीचे.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 1 ,४) 4 , ५) 3 , ६) 3.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.