मंगळवार, १६ जून, २०२६

परिच्छेद क्रमांक १८ दिलवाडा जैन मंदिरे

 मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक १८ दिलवाडा जैन मंदिरे



अतिशय कलासंपन्न व उत्फुल्ल प्रतिभेने निर्माण झालेली दिलवाडा जैन मंदिरे राजस्थानातील माऊंट आबूच्या उच्च शिखरावर विराजमान आहेत. संपूर्ण संगमरवराने बांधलेल्या भव्य मंदिरांचे वैशिष्ट्ये खांबावर कोरलेल्या गोष्टीरूप चित्रात आहेत. शिखर व खांब या दोन भागावर मंदिराचे सौंदर्य अनुभवता येते. तत्कालीन राजे व देवी देवतांचे समाजावर जे संस्कार झाले. ते भिंती व खांबावरून प्रकटतात. दिलवाडा मंदिर आवारात विमलवाशी, लुनावाशी, आदिनाथ, पार्श्वनाथ इत्यादी मंदिरे महत्वाची आहेत. विमल वाशी मंदिर विमल शहाने भीमदेव राजाच्या काळात इस. १०२१ मध्ये बांधले. हे मंदिर ९८ फूट उंच आणि ४२ फूट लांब आहे. ५२ देवकूलांसह स्थापलेले आहे. मंदिराच्या मंडपाचा आवार मध्यभागी मोकळा व बाजूने आठ खांबाणी वेढलेला आहे. हस्तिशाला, गूढ मंडप, रंगमंडप, माज आवार नौचोकी असे भाग मंदिर गाभाऱ्यापर्यंत आहेत. लुना वाशी मंदिर बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांच्या स्मृतीस अर्पण केलेले आहेत. इसवी सन १२३० मध्ये वास्तुपाल व देवपाल यांनी बांधले. विविध पानाफुलांची डिझाईन असणारी सोन्याचा मुलामा दिलेली तर प्राण्यांची चांदीचा मुलामा दिलेली चित्रे होती. हे ऐतिहासिक हस्तलिखितावरून समजते.



प्रश्न :

१) दिलवाडा जैन मंदिरे वसली आहेत. –

१)राजस्थान, २) मध्यप्रदेशात, ३) गुजरात ४) हरियाणात.


२) दिलवाडा मंदिरे कोणत्या समाजाची माहिती देतात. –

१) हिंदू, २) बौध्द, ३) जैन, ४) इस्लाम.


३) इसवी सन १०२१ मध्ये राजस्थानात राज्य होते. –

१) राजा विमल शहा, २) राणा प्रताप, ३) नेमिनाथ भगवान, ४) राजा भीमदेव.


४) नेमिनाथांपूर्वी झालेले तीर्थंकर आहेत. –

१) एकवीस, २) बावीस, ३) तेवीस, ४) वीस.


५) ‘ लुणावाशी ‘ मंदिरातील रंग आहेत. –

१) सोनेरी तपकिरी, २) सोनेरी हिरवट, ३) सोनेरी चांदीच्या रंगाचे, ४) सोनेरी व पिवळ्या.


उत्तरे : १) 1 , २) 3 , 3) 4 , ४) 1 , ५) 3 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...