मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक १७ बंगाली टायगर
जगभरात अनेक देशात वाघ आढळतात. वाघांच्या सामान्य उपजातीमध्ये बंगाली वाघ ही एक प्रजाती असून बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, तिबेट इ. आशियाई देशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सामान्यपणे भारतात आढळणारे रॉयल बंगाली टायगर्स हे लालसर तपकिरी रंगाचे असून त्यांच्या संपूर्ण शरीरावर काळसर पट्टे असतात. तथापि जीवशास्त्र विषयक बदलामुळे त्यांचा रंग पांढरा सुद्धा होऊ शकतो. हा वाघ पांढरा वाघ म्हणून ओळखतात. बंगाली वाघ हा भारतीय उपखंड व बांगलादेशाचा राष्ट्रीय पशु आहे. रॉयल बंगाली टायगर्सच्या नैसर्गिक वस्तीस्थानात भारतीय गवताळ प्रदेश, उष्ण कटिबंध, समशितोष्ण कटिबंधा दरम्यान असणारा भूप्रदेश, आणि उष्ण कटिबंधातील पर्जन्यीय जंगल, झाडांनी अच्छादलेले प्रदेश, ओले आणि कोरडे नियमितपणे पाने गळणारे वृक्ष असलेली जंगले, व पाणथळ प्रदेशातील झाडी यांचा समावेश आहे. हा प्राणी भारताच्या बंगाल प्रदेशात आढळून येतो. या जातीतील नर वाघाचे डोके आणि लांबी ६ ते ९ फुटांपर्यंत लांब असते. त्याच्या शेपटीची लांबी ३ फुटापर्यंत वाढ होऊ शकते. त्याचे वजन सरासरी ४०० ते ६६० पाऊंडापर्यंत असते.
प्रश्न :
१) ‘ बंगाली वाघ ‘ ही आहे एक –
१) वाघाची एक प्रजाती, २) भारतात आढळणारे पट्टेरी वाघ, ३) बंगाल मधील एक कला, ४) सिंहाची एक जात.
२) पर्यावरणाचा वाघावर झालेला परिणाम –
१) त्याची उंची खुंटली आहे.
२) त्याची शेपूट तीन फुटापर्यंत वाढली.
३) त्याच्या अंगावरील पट्ट्यांचा रंग बदलला आहे.
४) तो काळया रंगाचा झाला.
३)वाघ हा आहे राष्ट्रीय प्राणी, -
१) बांग्लादेशचा, २) भारताचा, ३) नेपाळचा, ४) पर्याय १ व २ बरोबर.
४) रॉयल बंगाली टायगर्सची लांबी शेपटीसह असते. –
१) ६ ते ९ फुटापर्यंत, २) ३ ते ७ फुटापर्यंत, ३) अंदाजे ९ ते १२ फूट, ४) फक्त पाच फूट.
५) ‘पाने गळणार्या वृक्षांचे जंगल’ या अर्थ असावा. –
१) सदाहरित अरण्ये.
२) पानझडी अरण्ये.
३) झुडपी व काटेरी अरण्ये.
४) नीम सदाहरित अरण्ये.
उत्तरे : १) 1 , २) 3 , ३) 4 , ४) 3 , ५) 2 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.