बुधवार, १७ जून, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २० सच्चा मित्र

  मराठी आकलन उतारा


परिच्छेद क्रमांक २० सच्चा मित्र


आर्य चाणक्याने नंद राजाचा पराभव करुन चंद्रगुप्ताला राज्य मिळवून दिले. चंद्रगुप्त राजा झाला. त्याला कुशल अमात्य हवा होता. नंदाचा अमात्य राक्षस नावाचा होता. तो कुशल राजकारणी असल्याने त्याला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळवावे असे चाणक्यांना वाटे. राक्षस आपल्या बायका मुलांना मित्र चंदनदासाकडे ठेवून अरण्यात गेला.

“ माझा प्राण गेला तरी चालेल, पण तुझा ठाव ठिकाणा सांगणार नाही. तुझ्याशी बेइमानी करणार नाही.” असे वचन त्याने राक्षसाला दिले होते. चाणक्यास गुप्त हेरांकडून राक्षसाचे कुटुंब चंदनदासाच्या घरी असल्याचे समजले. चाणक्याने काहीतरी खोटा आरोप घालून चंदन दास यास कैद केले. व तुरुंगात टाकले. व त्याला खूप त्रास दिला. पण त्याने राक्षसाचा ठावठिकाणा सांगितला नाही. शेवटी राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यास सुळावर देण्याची शिक्षा दिली. चाणक्याचा या मागे हेतू होता की चंदनदासाच्या शिक्षेची बातमी ऐकून राक्षस आपणहून आपल्याकडे येईल. हळूहळू बातमी राज्यभर पसरली. चंदनदास मित्रासाठी मृत्यूस तयार झाला. राक्षसास बातमी समजली. त्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. राजाला शरण जावे की मित्राला सुळावर जाऊ द्यावे. मनात मोठी खळबळ उडाली. शेवटी सूळी देण्याचा दिवस उजाडला. वध स्तंभाकडे चंदन दासला नेताना राक्षस तेथे हजर झाला. व म्हणाला, ‘मी आलो आहे. माझ्या मित्राला सोडा.’ तेव्हा चाणक्य म्हणाला, “ जर तू चंद्र गुप्ताचे अमात्य पद स्वीकारत असशील तरच आम्ही चंदन दासाला सोडू. तेव्हा राक्षसाने अट कबूल केली. धन्य ते मित्र जे एकमेकांसाठी मृत्यूस पुढे आले. धन्य तो चंदन दास जो मृत्यूस सामोरा गेला. व धन्य तो अमात्य राक्षस ज्याने मित्रासाठी शत्रू राजाचे अमात्य पद स्वीकारले.


प्रश्न :

१) चंद्रगुप्त राजा होण्यापूर्वी तेथे राजा असावा. –

१) चाणक्य, २) अमात्य राक्षस, ३) नंद राजा, ४) चंदन दास


२) चाणक्याने चंदन दासास तुरुंगात टाकले. कारण –

१) त्याला अमात्य राक्षसाला शिक्षा करायची होती.

२) तो राजद्रोही होता.

३) राक्षस अमात्यास त्याने अरण्यात पाठवले.

४) चाणक्यास अमात्य राक्षसास चंद्रगुप्ताचा अमात्य बनवायचे होते.


३)वधस्तंभ याचा अर्थ आहे.-

१) एक राज सिंहासन, २) अमात्याला बसवण्याची जागा, ३) मृत्युदेण्याचे ठिकाण, ४) असा स्तंभ जेथे वध नावाचा अधिकारी असतो.


४) राक्षसा पुढे मोठा पेच निर्माण झाला. – येथे पेच म्हणजे –

१) एक नाव, २) एक संकट, ३) निर्णय घेण्याचा कठीण प्रसंग, ४) निर्णय न घेण्याचा कठीण प्रसंग.


५) उताऱ्यास समर्पक शीर्षक द्या. –

१) सत्व, २) अमात्य व त्याचा मित्र, ३) कुटील चाणक्य, ४) मित्र परीक्षा.



उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 3 , ४) 3 , ५) 4 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...