गुरुवार, १८ जून, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २१ भारतीय नद्या

 मराठी आकलन उतारा

परिच्छेद क्रमांक २१ भारतीय नद्या 


भारतीय उपखंडाच्या पश्चिमेस अरब सागर तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. तसेच दक्षिण भागात हिंदी महासागर आहे. मान्सून वाऱ्याने पडणारा पाऊस व हिमालय पर्वतावरील बर्फ हेच भारतीय नद्यांचे प्रमूख जलस्त्रोत आहेत. गंगा ही भारतातील मोठे खोरे असणारी नदी. गंगोत्रीत उगम पावून उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार , पश्चिम बंगाल राज्यातून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.

नदी पात्रात माजूली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट असणारी ब्रह्मपुत्र ही गंगेची उपनदी आहे.

अमरकंटक मध्ये उगम पावणारी नर्मदा ही विंध्य व सातपुडा पर्वताच्या खचदरीमधून वाहत जाऊन अरब सागरास गुजरात मध्ये भडोच येथे संगम पावते. जबलपूर जवळ धुंवाधार जलप्रपात व भेडाघाटातील संगमरवरी घळ इथून वाहत जाऊन तो प्रदेश ती सुजलाम सुफलाम करते. महानदी छत्तीसगड राज्यातून ओडिशात वाहत जाऊन बंगालच्या उपसागराजवळ त्रिभुज प्रदेश बनवते. गोदावरी ही भारतीय पठारावरून वाहणारी दोन नंबर खोरे असणारी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्यातून बंगालच्या उपसागरास मिळते. कृष्णा व कावेरी या पठारी नद्या देखील बंगालच्या उपसागरास मिळतात. दक्षिण भारतातील बहुतांश नद्यांचा जल विभाजक पश्चिम घाट असून त्यास सह्याद्री म्हणतात. या पर्वतात गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांची उगमस्थाने पहायला मिळतात.


प्रश्न :

१) गंगा उगम पावते. –

१) गंगोत्री, २) सह्याद्री पर्वतात, ३) भारतीय पठारावर, ४)पाकिस्तानमध्ये.


२) नर्मदा नदी बाबत म्हणता येत नाही. –

१) अमरकंटक येथे निर्माण होते. २) तिच्यावर धबधबा आहे. ३) ती खचदारीतून वाहते. ४) ती पूर्वेकडे वाहत जाते.


३)बंगालच्या उपसागरात पाणी जाणार नाही. –

१) गंगा, २) नर्मदा, ३) कृष्णा, ४) गोदावरी.


४) माजूली हे एक आहे.-

१) नदीपात्रातील खडक, २) जगातील मोठे गोड्या पाण्यातील बेट. ४) जगातील मोठे खाऱ्या पाण्यातील बेट.


५) उताऱ्यात उल्लेखलेल्या नद्यांना पाणी मिळते. –

१) बर्फापासून फक्त, २) जमिनीत उमटणाऱ्या उगळापासून, ३) फक्त पावसाचे, ४) बर्फ वितळून व मान्सून पावसापासून.


६) पश्चिम घाटातून जन्म होत नाही.-

१) कृष्णा, २) गोदावरी, ३) कावेरी, ४) नर्मदा.


७) सह्याद्रीस म्हंटले जाते. –

१) हिमगिरी, २) प. घाट, ३) पू. घाट, ४) जल उत्पादक.



उत्तरे : १) 1 , २) 4 , ३) 2 , ४) 2 , ५) 4 , ६) 4 , ७) 2 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...