लाकडाच्या प्रतिकृतीवर बसून मुले टिक टॉक करत खेळतात. तो अश्व पृथ्वी तलावर मानवा अधीपासून हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. घोडा मूळ मध्य आशिया खंडातला, तेथून त्याच्या तीन शाखा पडल्या. त्यातील एक चिनी मंगोलियन तर दुसरी पश्चिमेस युरोपात व तिसरी महत्वाची ईशान्येकडील पर्शिया ( इराण) , भारत, अरेबिया, इजिप्त मार्गे आफ्रिकेत गेली. तो बदलत्या जीवन शैलीचा भाग असून पूर्वीपासून युद्ध, दळणवळण, रेस यासाठी वापरला जातो. तो रात्रीचा जन्मतो. जन्मल्यावर थोड्या तासातच उभा राहतो. तो उंचीला साडे पाच ते सहा फूट असून त्याचे वजन साडे तीनशे किलोपर्यंत असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत डोळे मोठे असल्याने तो ३६०° मध्ये पाहू शकतो. आयाळ व शेपटीचे केस लांब असतात. चारी पायाच्या आतील किन (पट्टे) असतात. स्वारीसाठी रेसला, वाहनास जुंपने, तसेच शेती कामास व अवजड समान वाहून नेण्यास त्याच्या वेगवेगळ्या भाऊबंदांचा उपयोग होतो. तो शाकाहारी आहे. व गवत, हरभरा, कुळीथ व तूर खाणे आवडते. खाद्या इतकेच खरार्याला महत्व असते. त्याच्या त्वचेवरील केर कचरा, कोंडा, घामाचा मळ काढून टाकण्यास रोज खरारा करतात. बद्धिमध्ये घोड्याचा चौथा क्रमांक असून त्याच्या इमानी कथा प्रसिद्ध आहेत. त्याची शक्ती प्रमाण मानून त्यावर आधारलेले अश्व शक्ती (हॉर्स पॉवर) हे शक्तीचे एकक चलनात आहे.
प्रश्न :
१) घोडा पहिल्यांदा कोठे आढळत होता?
१) आफ्रिका खंडात, २) चीन व मंगोलियात, ३) इजिप्तमध्ये, ४) आशिया खंडाच्या मध्य भागात.
२) मादी घोडा आपल्या पिल्लास या जगात आणतो. –
१) सूर्य दर्शन होताच. २) भर दुपारी, ३) सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवेपर्यंतच्या काळात.
३) सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत.
३)घोड्याच्या पाठीवर केस असतात. –
१) शेपटी पेक्षा लांब, २) आयाळा पेक्षा लांब, ३) शेपटी व आयाळा वरील केसा पेक्षा लांब, ४) शेपटी व आयाळा वरील केसा पेक्षा आखूड.
४) अश्वशक्ती म्हणजे –
१) घोड्याची ताकद, २) शक्ती मोजण्याचे एकक, ३) आश्वाचा शक्ती निर्मितीस वापर.४) घोड्याची ऊर्जा.
५) घोडा पाहू शकतो. –
१) फक्त समोर, २) फक्त उजव्या बाजूस. ३) फक्त डावीकडे, ४) सर्व बाजूंना.
उत्तरे : १) 4 , २) 3 , ३) 4, ४) 2 , ५) 4 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.