मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २४
राजस्थानमध्ये अनेक कलाकृती पहावयास मिळतात. उदयपूर गावाजवळ अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तेथील भगवान एकलिंगजी मंदिर उल्लेखनीय आहे. शिवाचे रूप असणारे हे मंदीर इसवी सन ७३४ ला स्थापले गेले. महादेव पिंडीची गोलात्मकता दाखवलेली कलात्मकता येथे दिसते. मेवाड राजवटीत बांधले गेलेले हे दैवत त्रिवेदी मेवाड व भत्ता यांचे कुलदैवत आहे. २५०० चौ. मीटर क्षेत्र असणाऱ्या मंदिरात १०८ विविध रुपे शिवाची आहेत. मंदिरातील खांब हे अतिशय नाजूक नक्षी कोरलेले असून मोठे मार्बल व ग्रॅनाईटचा वापर आढळतो. शिवमूर्ती ही कभींन्न काळया रंगात असून राजस्थानातील उष्ण भागात या मंदिरात सुखद गारवा आहे. चौमुखी शिवमूर्तीत विष्णू ( उत्तर), सूर्य (पूर्व), रुद्र ( दक्षिण), ब्रह्मा ( पश्चिम) अशी रचना आहे. शिव वाहन नंदीची प्रतिमा मंदीर प्रवेशद्वाराजवळ आहे. गाभारा भिंतीवर गणपती, शिव, पार्वती, यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. शिवलिंग चांदीच्या सर्पाने वेढले आहे. कोरीव कामात बारकावा हळुवारपणा नृत्य आविष्कार व डोळ्यातील हावभाव देखना आहे.
प्रश्न :
१) एकलिंगजी मंदिर आहे. –
१) हिंदू धर्माची वैभवता, २) इस्लामची चैतन्य वास्तू, ३) बौद्ध धर्माचे शिल्प, ४) जैन कलाकृती आविष्कार.
२) रुद्र देवतेच्या विरुद्ध असावे. –
१) सूर्याचे मुख, २) विष्णूचे मुख, ३) ब्रह्माचे मुख, ४) सरस्वतीचे मुख.
३)नंदी आहे शिवाचे एक –
१) आयुध, २) पाण्याचा प्रवाह, ३) प्रवेशद्वाराची प्रतिमा, ४) शिवाचे प्रवासी साधन.
४) एकलिंगजी मंदिरात खालीलपैकी कोणती कलाकृती आढळली नाही. –
१) शिव, २) विष्णू देवता, ३) येशूची, ४) गणपती.
५) मार्बल व ग्रेनाइट आहेत. –
१) मातीचे प्रकार, २) दगडाचे प्रकार, ३) खनिज संपत्ती, ४) लाकडाचे प्रकार.
उत्तरे : १) 1 , २) 2 , ३) 4 , ४) 3 ,५) 2 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.