मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक २७
दिवसभर ओझे उचलून तो थकला होता. त्या दिवसभरात त्याला एक ब्रेडचा तुकडा व थोडेसे पाणी मिळाले होते. दिवसभरातून केलेल्या ओझे वाहतुकीचे त्यास सोळा आणे मिळाले होते. वाण दुकानातून त्याने थोडे तांदूळ व डाळ विकत घेतली. त्यासाठी चाळीस पैसे खर्च केले. आपल्या लहान यास्मिनसाठी त्याने भाजके शेंगदाणे व चुरमुरे दहा पैसे देऊन घेतले. घरी येताना नाला पुलावर बसलेल्या अपंग वृद्धेच्या वाडग्यात त्याने वीस पैसे टाकले.
घरी परतल्यावर त्याने आणलेलं साहित्य घरी ठेवले. व तो बारवीवर गेला. कपडे काढताना सुट्टे पाच पैसे बारावीच्या कठड्यावरून डुबुक करत आत गेले. त्याने आपले संपूर्ण अंग स्वच्छ केले. व परसबागेतून एक वांगे, दहा भेंड्या, थोडी मेथी, एक लिंबू व केळीचा एक घड घेऊन तो घरात आला. तेव्हा बाहेर अंधार पडत होता. त्याच्या पत्नीने त्याला बाजरीची भाकर व चार मिरच्या व कांदा खायला दिले. ते खाऊन तो पलंगावर दुखरे अंग घेऊन निपचीत पडला.
प्रश्न :
१) तो थकला होता. –
१) खूप कसरत करुन. २) पावाच्या लाद्या उचलून, ३) कमी अन्न मिळाले म्हणून, ४) खूप श्रम झाले म्हणून.
२) दिवसभराच्या ओझे उचलण्याचा त्यास मिळाला मेहनताना –
१) आठ आणे, २) सोळा रुपये, ३) एक रुपया, ४) बारा आणे.
३)दिवसभराच्या कामातून त्याकडे विसावा घेताना राहिलेला मेहनताना. –
१) फक्त सोळा आणे, २) फक्त पंचाहत्तर पैसे, ३) फक्त पंधरा रुपये पंचवीस पैसे, ४) फक्त पंचवीस पैसे.
४) बारवी शेजारी परस बागेत नव्हते. –
१) भेंडी, २) केळी, ३) वांगी, ४) रताळे.
५) ‘निपचीत पडणे’ या वाक्य संप्रदायाचा भावार्थ आहे. –
१) अस्वस्थ होणे, २) अचंबित होऊन पडणे, ३) शांत व स्थीर पहुडणे ४) मरण पावणे.
उत्तरे : १) 4 , २) 3 , ३) 4 , ४) 4 , ५) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.