शुक्रवार, १० जुलै, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २८

 

मराठी आकलन उतारा 

परिच्छेद क्रमांक २८


रात्रीच्या वेळी उंचावरून किंवा विमानातून झगमगती महानगरे पाहताना मानवी प्रगतीने (?) अचंबित व्हायला होते. निसर्गाच्या दिवस – रात्र या रचनेत सजीवांनी हजारो शतके जीवसृष्टी त्यात पोसली. उत्क्रांत होत गेली. मानवी आरोग्याशीही प्रकाशाचा संबंध जाणून घेतला पाहिजे. रात्रीचा अंधारच लोप पावल्याने शहरामध्ये नाईट लाईफ नावाची भानगड तयार झालीय. त्यामुळे शहरवाशीयांना टिपूर चांदणे अनुभवलेय का? असेच विचारावे लागेल. दररोज चंद्र उगवूनही तो डोळ्यात साठवता येत नाही. त्यामुळे की काय बेडरूममध्ये कृत्रिम चांदणे साकारले जातेय. घराच्या रचनेत इलेक्ट्रिक यंत्रणेचे स्थान काय आणि ते किती असावे. याबद्दल मागे वळून पाहायची वेळ नक्कीच आली आहे. आपल्या गरजा, घराचे बजेट, इलेक्ट्रिक साहित्याचा दर्जा, सुरक्षितता, आणि भविष्यातील वापर आणि देखभाल खर्च याचा विचार साकल्याने झाला पाहिजे. प्रकाश ऊर्जेच्या बाबतीत आपले घर कमीत कमी परावलंबी हवे. ग्रीन बिल्डिंग ( हरित इमारत) संकल्पना त्यातूनच जोम धरतेय. मात्र ही संकल्पना आयात नको. तर स्थानिक पातळीवर विकसित व्हावी असे वाटते.

प्रश्न :

१) अंधाऱ्या रात्री आकाशातून मानवी नगरे पाहिल्यावर वाटते. –

१)झगमगाट, २) विमानातून पहावे, ३) नगरे छोटी दिसतात, ४) नवल वाटते.

२) शहरी लोकांना चंद्र प्रकाशाची मौज मिळते. –

१) चांदण्यारात्री फिरून, २) टेरेसवर जाऊन, ३) कृत्रिम रचनेतून, ४) खिडकीत उभे राहून,

३) रात्रीचा अंधार शहरातून लोप पावला. कारण –

१) रात्रीचे कृत्रिम चांदणे पाडले जाते, २) शहरातील रात्रीचा झगमगाट, ३) शहरात रात्रीचा चंद्र उगवतो. ४) शहरात नाईट लाईफ नसते.

४) प्रकाश ऊर्जेच्या बाबतीत आपले घर –

१) स्वावलंबी असावे, २) परावलंबी जास्त हवे, ३) सूर्य तापक यंत्र बसवावे, ४) अंधारमय असावे.

५) उताऱ्यास योग्य शीर्षक द्या. –

१) कृत्रिम चांदणे, २) नाईट लाईफचे परिणाम, ३) चांदणे, ४) झगमगती महानगरे.



उत्तरे : १) 4 , २) 3 , ३) 2 , ४) 1 , ५) 1 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...