शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

मराठी भाषा आकलन उतारा परिच्छेद क्रमांक ३१


होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची. आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. घरापुढील छोट्या गॅलरीत झोपायला परवानगी मिळायची. मोकळ्या अंगणात अंथरुण पडायची ती सुट्टी पडल्यावर. पण मार्च एप्रिल पर्यंत गॅलरीत झोपायला मिळायचं. तेव्हा वाऱ्याची मंद झुळूक अंगावर घेत. आम्ही बहिण भाऊ अंथरुणावर पडायचो. खूप वेळा गप्पा करत बसायचो. मग रात्रीचे मऊ गार हात अंगावर फिरायला लागले. की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच विचार यायचा. उद्या कुहू s s ऐकू येईल? बघू ह! पहाटे गाढ झोपेत असताना तो आवाज कानावर यायचा. कुहू s s आणि पापण्या टक्क उघडल्या जायच्या. त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.

 आणखी एक वाट पाहणं होतं. पोपटाच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक उंबराच झाडं होत. उन्ह तापण्याचे दिवस आले की ग्रीष्मात त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरी गाठी गाठीच ते झाड. तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं . मी वाट पहायचे त्या थव्यांची , त्या लालसर गोड उंबराची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची 


प्रश्न :

१) आंब्याला मोहर घमघमायचा –

१) हिवाळ्याच्या सुरवातीला, २) उन्हाळ्याच्या प्रारंभीस, ३) आंबे लागल्यावर, ४) थंडीच्या दिवसात .

२) लेखिकेच्या घरामागे झाड होते. –

१) पिंपळाचे, २) अश्वथ वृक्ष, ३) औदुंबर, ४) वडाचे.

३)पहाटे लेखिकेस जाग येई.- 

१) पारव्याचे ओरडणे, २) कोंबड्यांचे आरवणे,

३) कोकिळ कूजन ऐकून. ४) पोपटाच्या आवाजाने. 

४) उंबर वृक्षाची पाने असत. –

१) खूप देखणी २) सुंदर, ३) मोठ्या आकाराची, ४) छोट्या गाठी असणारी कुरूप.

५) मुले अंगणात झोपत असत. – 

१) पावसाळ्यात २) हिवाळ्यात, ३) मार्च व एप्रिल दरम्यान. ४) मे महिन्यात.

६) उताऱ्यास समर्पक शीर्षक द्या. –

१) उन्हाळ्याची मौज, २) नयनरम्य रात्र, ३) माझ्या आठवणीतील ग्रीष्म, ४) वाट पाहताना.



उत्तरे : १) 2 , २) 3 , ३) 3 , ४) 4 , ५) 4 , ६) 4 .
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...