छबिलदास शाळेमध्ये सर्व धर्मांची मध्यम वर्गातील व श्रमजीवी लोकांची मुले शिकत होती. डॉ. नरेंद्र जाधवांच्या आई वडिलांची भाषा ही गावाकडील बोली भाषा होती. ती लोकांना अशुध्द वाटायची. त्याच भाषेचे संस्कार त्यांवर झाले होते. त्यामुळे शाळेत कधी ते तोंड उघडून घडाघडा बोलले नाहीत. मी शाळेत एखाद्या घुम्या सारखा असे. शाळेत त्यांचा प्रथम क्रमांक येऊन सुद्धा त्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. ते वर्गात मागच्या बाकावर भिजलेल्या उंदरासारखे बसून असायचे. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत असून देखील त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसत. कारण तेव्हा त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता.
शाळेत मिळालेल्या चांगल्या शिक्षकांत माधव साखरदंडे शिक्षक हे एक होते. एकदा साखरदंडे सर वर्गात आले. त्यांनी नरेंद्रास उभा केले. व हस्ताक्षर स्पर्धेत भाग का घेतला नाही. विचारलं. त्यांनी वही घेऊन जवळ बोलावलं. व स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मुलाचे हस्ताक्षर व नरेंद्रच्या वाहितली अक्षरे समोर ठेवली. व विचारलं. यातील कोणते चांगले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या मुलापेक्षा नरेंद्रचे अक्षर चांगले होते. तेव्हा आपण स्पर्धेत भाग घ्यायला हवा होता. हे जाणवलं. तेथून पुढे प्रत्येक स्पर्धेत ते सहभागी होऊ लागले.
प्रश्न :
१) छबिलदास शाळेचे वैशिष्ट्ये होते.-
१) तेथे हिंदू व मुसलमान मुले फक्त शिकत,
२) धर्मांधता शाळा,
३) धर्मनिरपेक्ष शाळा,
४) फक्त श्रीमंत मुले शिकत असत.
२) लेखक बाकावर भिजलेल्या उंदरासारखा बसे. कारण –
१) तो उंदरासारखा दिसत असे.
२) तो शाळेत भिजून येई,
३) त्याला आत्मविश्वास होता.
४) आपल्यात काही कमी असावे हे मानत होते.
३) जर लेखकाने हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला असता तर …
१) लेखकाचा दुसरा क्रमांक आला असता.
२) लेखकास शिक्षा झाली असती,
३) नरेंद्रास प्रथम पारितोषिक मिळाले नसते.
४) हस्ताक्षर स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी द्वितीय आला असता.
४) लेखकाचे आई वडील –
१) चांगले मराठी बोलत.
२) ग्रामीण भाषेत बोलत.
३) मुके होते.
४) त्यांची मातृभाषा इंग्रजी होती.
५) नरेंद्रच्या मनातील न्यूनगंड कमी झाला. –
१) जेव्हा त्यांचे हस्ताक्षर सुधारले.
२) जेव्हा तो स्पर्धेतून बाहेर पडला.
३) साखरदांडे सरांनी त्याची चूक लक्षात आणून दिली.
४) तो पुढील बाकावर बसू लागला.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 4 , ४) 2 , ५) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.