रविवार, २ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक ३३



भीमाशंकरच्या पिंडीखालून निघालेली भीमा भूगर्भातून वाहत बाहेर पडते. उंच खडकावरून खाली कोसळते. तिचा पांढराशुभ्र धबधबा खूप सुंदर दिसतो. त्याचा नाद मनाला साद घालतो. दोन्ही बाजूस हिरवीगर्द वनराई आहे. आकाशात कृष्णगरूड घिरट्या घालतो. झुडपात पतंगासारखी लांब शेपटी असलेला नर्तक दिसतो. बुलबुल, तांबट, सुतार, वनकपोत व पारवे या पाखरांचे दर्शन घडते. भीमाशंकर अभयारण्याच्या मुंबई पॉईंट या कड्यावरून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडते. खाली मुरबाड व कल्याणचा परिसर दिसतो. वनस्पती पॉईंटच्या पुढे हनुमान तळे लागते. हा सारा परिसर वृक्षवल्लींनी सजलेला आहे. तेथे हिरव्यागार पाण्याने भरलेली दगडी पाण्याची बारव आहे. पुढे नागाच्या फणी सारखा दिसणारा नागफणी कडा आहे. तेथून दरितील कोकणाचे सुंदर दर्शन घडते. पोखरी गावाच्या पुढील घाट उतरला की घोड नदीवरचे डिंबे धरण दिसते. या परिसरातल्या रानात संध्याकाळी कोल्हे, तरस, रान उंदरासाठी टपून बसलेली शृंगी घुबडे ही दिसतात. कोंढवळ गावाच्या हद्दीत आदिवासींची भात खाचरे आहेत. हिवाळ्यात तेथे रानडुक्करे दिसतात. भट्टीच्या रानात पाण्याचा जिवंत झरा असलेली वाकी विहीर आहे. सर्व पाणवठे उन्हाळ्यात अटतात. ही विहीर अटत नाही. वन्य प्राण्यांना येथेच पाणी मिळते. विहिरीकाठच्या ओल्या मातीत प्राण्यांच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात.


प्रश्न :

१) भीमा नदीचा उगम होतो. –

१) भूगर्भातून, २) भीमाशंकर पिंडीखालून, ३) डोंगरात, ४) झाडीत.

२) भर उन्हाळ्यात कोठे पाणी असते.- 

१) भीमेच्या डोंगरात, २) वाकी गावी, ३) वाकी विहिरीत, ४) भट्टीच्या गावात.

३)मुरबाड व कल्याणच्या कोणत्या बाजूस भीमाशंकरचा मुंबई पॉईंट आहे?

१) पूर्व, २) पश्चिम, ३) उत्तर, ४) दक्षिण.

४)पाऊलखुणा कोठे पाहायला मिळतात?

१)झाडांवर, २) फळात, ३) ओल्यामातीत, ४) बारवी काठच्या ओल्या मातीत.

५) पतंग व नर्तक यामध्ये समानता आहे?

१) डोळे, २) रंग, ३) चोच, ४) शेपूट.

६) शृंगी घुबड टपून बसत असत. यामधील टपून बसत म्हणजे. –

१) निरीक्षण करत नसत.

२) लक्ष न देणे.

३) बारकाईने पाहत.

४) शिकार करत.


उत्तरे : १) 2 , २) 3 , ३) 1 , ४) 4 , ५) 4 , ६) 3






















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...