मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक 48
ती एक निरभ्र चांदणी रात्र होती. समुद्राच्या चमचमणाऱ्या पाण्यात क्षितिजापर्यंतचे तारकाच्छदीत आकाश प्रतिबिंबित होते. सुबाहू जहाजाच्या छायाकृतीकडे पाहत उभा होता. चंदेरी चमचमणाऱ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर ती भव्य वाटत होती. सुबाहूला त्याच्या पायाखालील थंड ओलसर वाळूचा स्पर्श झाला. आणि तो तणावमुक्त झाला. संपूर्ण दिवसभर त्यांनी जहाजावर माल चढवण्याच्या कामावर देखरेख केली होती. आणि जहाजावरील खलाशांना सूचना केल्या होत्या. आता प्रवासाला सुरुवात करण्याची सर्व काही तयारी आहे. त्याने विचार केला प्रत्येक जलप्रवास सुरू होताना त्याला वाटे त्याप्रमाणे त्याचे हृदय उत्सुकतेने धडधडले. त्याच्यासमोर वाळूत पडलेली पडछाया पाहून तो मागे वळला. “नागदत्ता, बाळा तू झोपायला हवा होतास. उद्या लवकर आपण प्रवास सुरू करतोय हा तुझा पहिलाच जलप्रवास आहे नाही का?”
प्रश्न :
१) प्रथम सागर सफर करणारा होता. …..
१) सुबाहू .
२) नागदत्त.
३) बाळ.
४) माल चढवणारा हमाल.
२) वाळूच्या कणांना स्पर्श झाला होता …..
१) सुबाहूच्या पायांचा.
२) नागदत्तच्या हातांचा.
३) खलाशांच्या हातांचा.
४) सागरीजलाचा.
३) तारकांचे बिंब पहावयास मिळत होते. …..
१) आकाशात.
२) धरतीवर.
३) समुद्राच्या पाण्यात.
४) जहाजात
४) सुबाहू होता एक …..
१) हमाल.
२) वाटाड्या.
३) व्यापारी.
४) एक खलाशी.
५) ‘आकाश व जमिनीचा संगम’ या वाक्य समुदायाचा अर्थ …..
१) तारांगण.
२) चंदेरी दुनिया.
३) पडछाया.
४) क्षितिज.
६) ती रात्र नव्हती. …..
१)चंदेरी.
२)चंद्राच्या अस्तित्वाची.
३)निरभ्र.
४) अमावश्येची.
उत्तरे. : १) 2 , २) 1 , ३) 1 ४) 4 , ५) 4 , ६) 4 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.