गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 49 व्यंजना शक्ती उतारा

 मराठी आकलन उतारा
 परिच्छेद क्रमांक 49 
व्यंजना शक्ती उतारा 



काही इमारतीत सूर्यप्रकाशाला विवेक्षित मार्गाने इमारतीच्या इतर भागांकडे पाठवण्यासाठी प्रकाशीय तंतूचा वापर केला जातो. बिलोरी काचांपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडलेल्या प्रदर्शनी कपाटांना प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकीय तंतूंचा वापर केला जातो. बरेचसे तंतूचे जुडगे काचेच्या वस्तूंना वेगवेगळ्या कोणातून प्रकाशित करतात ते किती सुंदर दृश्य निर्माण करत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता काय? दुकानांच्या खिडक्यांमध्ये तुम्ही सुंदर प्रकाशित तंतूचे प्रकाश कारंजे पाहिले असेलच. पुष्कळशे काचतंतू तळातून कारंजासारखे झेपावतात. तळाशी एक विद्युत दिवा असतो. तो पेटवला जातो. तेव्हा प्रत्येक तंतूचे टोक एका छोट्याशा ठिणगी सारखेच चकाकते. दिव्याभोवती अंधार असेल तर तंतूमधून प्रकाश अस्पष्टपणे वाहून जाताना सुद्धा तुम्हाला दिसेल. त्याही दिव्यामध्ये प्रकाशाचे रंग देखील अखंडपणे बदलत असतात. ते खरोखर अतिशय छान दृश्य असते. प्रकाशिय तंतू जीवन वाचवण्यापासून ते जीवन सुंदर करण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकतात.


 प्रश्न 

१) प्रकाश कारंजे निर्मितीस आवश्यक असतो.

१)बल्ब.

२) विद्युतदीप.

 ३) कारंजे.

 ४) प्रकाश उगम स्त्रोत.


 २) दुकानात प्रकाश कारंजे असतात. …..

 १) खरेदीसाठी.

 २) विक्रीसाठी.

 ३) मन खिन्न राहण्यास.

 ४) आकर्षुण घेण्यासाठी.


३) ‘प्रकाशतंतू जीवन वाचवतात’ या वाक्यातून सुचवायचे आहे. ….

 १) ते दवाखान्यात वापरले जातात.

२) प्रकाशतंतूत सूक्त शक्ती असते.

 ३) प्रकाश तंतू अंधारात मार्गदर्शन करतात.

 ४) ते फक्त सूर्याचे द्योतक आहेत.


 ४) ‘प्रदर्शनी मांडण्याचे कपाट’ म्हणजे ….

 १) प्रदर्शनात कपाट वापरले जाते.

 २) जाड लाकडी कपाट.

 ३) विद्युत पुरवठा करण्याचे कपाट.

४) शोकेसिस.


 ५) सूर्यप्रकाश विवक्षित मार्गाने इमारतीत पाठवल्याने.

 १) इमारत झाकोळूण निघते.

 २) सूर्यप्रकाश कोणामध्ये एकवटतो.

 ३) विद्युत बचत होऊ शकते.

 ४) ड जीवनसत्व निर्माण होते.


 ६) काही दिव्यांमध्ये प्रकाशाचे रंग बदलतात. …

१) हे त्या दिव्यांमध्ये काचांना आतुन रंग देतात.

 २) दिव्यातील रंगाची चकती फिरत असते.

 ३) मुख्य दिव्याभोवती रंगाचे अच्छादन असते.

 ४) प्रकाशाचे रंग काच कोनातून जाताना पसरतात.




उत्तरे : १) 4 , २) 4 , ३) 1 , ४) 4 , ५) 1 , ६) 4 .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...