मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 50
प्राचीन भारतीयांना जहाज बांधणी व जल पर्यटनाचे शास्त्र अवगत होते. अनेक संस्कृत व पालीभाषक ग्रंथात जलपर्यटनाचे उल्लेख आहेत. भारतीय समुद्र किनाऱ्यावरील लोक जावा, सुमात्रा, कंबोडिया, चीन या पूर्व देशांशी व्यापार करत. काही लोक दक्षिण अमेरिकेपर्यंत गेले. अरब सागराच्या पलिकडे अरेबिया, इजिप्त आणि पर्शियापर्यंत प्रवास केला. अजिंठ्याच्या चित्रात समुद्र प्रवास करणाऱ्या जहाजाचे चित्र आढळते. मोहेंजोदडो येथे सुद्धा समुद्र प्रवास करणारी नाव आढळली. यावरून भारतीय लोक समुद्र सफर करत हे समजले. सागर प्रवास करणाऱ्यांना दिशांचे चांगले ज्ञान असावे लागते. प्राचीन भारतीयांनी तार्यांचा अभ्यास केल्याने त्यांना दिशा समजत. त्यांना होकायंत्राचे ज्ञान होते. त्याला ते ‘मच्छयंत्र’ असे संबोधत असत. तो तेलात तरंगणारा एक मासा असे. आणि नेहमी उत्तर दिशा दर्शवत असे. जहाजावर सामान चढवले व उतरले जाते. तेथे समुद्रकाठाला जहाजे बांधली जात. त्या ठिकाणास गोदी असे म्हणत. गुजरात येथील उत्खननात सापडलेली लोथल या ठिकाणचे गोदीच्या अवशेषावरून भारताची प्रगती समजते. भारतीय समुद्र भरती व ओहोटी ओळखत. व योग्य ऋतू पाहून प्रवास करत.
प्रश्न :
१) इजिप्त व पर्शियाहून भारतीय मायदेशी जाताना प्रवास करत असत……
१) पूर्व दिशेस.
२) पश्चिमेस.
३) उत्तरेस.
४) अरब सागराच्या पश्चिमेस.
२) तेलात रंगणारा मासा मदत करत असे. …..
१) समुद्रात नौका चालवण्यास.
२) समुद्री वादळाचे ज्ञान करून देई.
३) दिशादर्शक म्हणून.
४) भरती व ओहोटी पाहणेस.
३) खालीलपैकी पौर्वात्य देश नसावा. ..
१) इजिप्त.
२) जावा.
३) चीन.
४) कंबोडिया.
४) प्राचीन भारतीय अज्ञानी होते. ….
१) खगोलशास्त्राविषयी.
२) दिशांविषयी.
३) चित्रकलेविषयी.
४) अर्वाचीन जहाजाविषयी.
५) समुद्र प्रवासात ‘मच्छयंत्र’ हरवलेस, भारतीयांचे वाटाडे होते. –
१) सागरी लाटा.
२)समुद्रात रंगणारा मासा.
३) अवकाशातील नक्षत्रे.
४) सागरी प्रवाह दिशा.
६) भारतीय बनावटीचे जहाज बांधणीचा पुरावा दर्शक ठिकाण. –
१) लोथल.
२)अजिंठा.
३) संस्कृत व पाली ग्रंथ.
४) मच्छ यंत्र.
उत्तरे : १) 1 , २) 3 , ३) 1 , ४) 4 , ५) 3 , ६) 1 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.