मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक 52
साव म्हणजे सत्यनिष्ठ माणूस, सचोटीने वागणारा माणूस , समाज व्यवहारात अन् शासन व्यवहारात अनेकदा मोठे मजेशीर प्रसंग घडतात. प्रचलित धारणेला धक्का देणारे अनुभव असतात. अनेकदा असे घडते. की दोषी माणसाला सन्मान लागतो. अपात्र माणसाला पद मिळते. सचोटीने वागणाऱ्या माणसाला मात्र फासावर चढविले जाते. कदाचित स्वार्थ असेल. कदाचित बदला असेल व कुणाची तरी सक्ती असेल, मात्र अशा गोष्टी घडताना आपण नेहमी पाहतो. सज्जनाचा गौरव व्हायला हवा. नि चोराला फाशी व्हायला हवी. मात्र व्यवहारात घडते नेमके उलटेच, भ्रष्ट अनितिमान, मनमानी, कारभारासाठी ही म्हण वापरली जाते.
प्रश्न :
१) साव म्हणजे…..
१) साधुपुरुष.
२) गुन्हेगार नसणारा.
३) नियमबद्ध वर्तणूक असणारा.
४) तपस्या करणारी व्यक्ती.
२) समाजात दोषी माणसाला सन्मान मिळतो. …..
१) त्याच्या कर्तृत्वहीन वागणुकीने.
२) जन अज्ञानामुळे.
३) सचोटी युक्त वागणूक.
४) सत्यनिष्ठ वर्तनाने.
३) घटनात्मक समूह व्यवस्था …..
१) समाज.
२) शासन.
३) साव.
४) मनमानी कारभार.
४) निर्दोष व्यक्ती नाश पावतात. ….
१) सत्यनिष्ठ वागणुकीमुळे.
२) ते सावासारखे वागतात यामुळे.
३) प्रचलित धारणेला धक्का देतात यामुळे
४) स्वार्थ बदला व कोणाच्याही सक्तीमुळे बळी पावतात.
५) उताऱ्यातून लाभणारे सार कोणते -
१)निर्दोष व्यक्तींचा र्हास.
२)मनमानी कारभाराचे परिणाम.
३) गुन्हा कर्ता सोडून निर्दोषांचा बळी.
४) चोराला फाशी व सावाला सिंहासन.
उत्तरे : १) 3 , २) 1 , ३) 2 , ४) 4 , ५) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.