सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परीच्छेद क्रमांक 53

 मराठी आकलन उतारा
परीच्छेद क्रमांक 53

यावर्षी दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसल्या. विहिरी, नद्या कोरड्या पडल्या. पाण्याअभावी पिके करपली. जनावरांना चारा मिळेणा. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागली. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊ लागल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले. परिणामी कमी पाऊस पडला. या दुष्काळाने मानवाला बरेच काही शिकवले. झाडे लावली नाही तर काही खरे नाही, हे जाणून पर्यावरण पूरकतेला महत्त्व देण्यात आले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी अंगणात, शेतात, बागेत माळरानात वृक्षारोपण केले. मी एक तरी झाड लावून त्याची निगा राखणार, अशी प्रतिज्ञा केली.

 प्रश्न :


१) दुष्काळाच्या झळा मारु लागल्या,….

१) विहिरी आटल्याने.

२) नद्या कोरड्या पडल्या म्हणून.

३) तीन पिके करपल्यामुळे.

४) पाऊस किमान झाल्यामुळे.


२) ‘कत्तल होऊ लागल्याने' याचा अर्थ काय?

१) अस्तित्व निर्माण होणे.

२) पुनरुत्पादन.

३) नामशेष होणे.

४) संख्या घटने.


३) दुष्काळ व मानव यांचे नाते बनले. –

१) पिता पुत्राचे.

२) पाठ शिवनीच्या खेळाचे.

३) मैत्रीचे.

४) गुरु शिष्याचे.


४) भटकंती करावी लागली….

१)दुष्काळ हटवण्यासाठी.

 २) निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी.

 ३) पाणी शोधण्यासाठी.

 ४) झाडांना घागरभर पाणी घालण्यासाठी.


 ५) नागरिकांनी वृक्षारोपण केले. ….

 १) 22 मार्चला. २) 1 जूनला. ३) ८ जुलैला. ४) 5 जूनला.



उत्तरे : १) 4 , २) 3 , ३) 4 , ४) 3 , ५) 4 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...