सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 55

 मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक 55



 एकदा रामबल फळं विकत घेत होता. “ खूपच महाग आहेत आंबे! जर तू भाव कमी केलास, तर मी तुझ्याकडचे सगळे सडके आंबे घेईन.

 विक्रेत्याला हे मान्य झाले. त्याने पटकन सडके आंबे शोधून दिले. ‘हे घ्या , मी हे तुम्हाला निम्म्या किमतीत देईन.”

“पण मी आता माझा विचार बदललाय. एक डझन उत्तम आंबे दे. मी तुला तुझा योग्य भाव देतो.”

“ मग तुम्ही मला हे सडके आंबे कशाला काढायला लावलेत?”

“कारण त्यातले काही आंबे तू मला नजर चुकवून टाकू नयेस म्हणून.”


 प्रश्न :

१) रामबाण होता एक –

१) एक साधारण मनुष्य.

२) एक विक्रेता.

३) तीन खरेदीदार.

४) कंजूष व्यक्ती.


२) ‘सडके आंबे शोधून दिले.’ या वाक्यात शोधून दिले याचा अर्थ आहे. …..

१) बाजूला काढले.

२) उरकले.

३) टाकले.

४) मोकळे केले.


३) सडके आंबे काढले गेले कारण –

१)ते निम्म्या किमतीला घेतले जाणार होते.

२) ते सडके होते म्हणून.

 ३) ते रामबलला हवे होते म्हणून.

 ४) रामबल ते घेणार नव्हता म्हणून.


 ४) सडके आंबे काढावयास लावले गेले कारण –

 १) ते सडके होते म्हणून.

 २) ते निरोपयोगी असल्याने रामबल घेणार होता.

३) रामबल ते घेणार नव्हता म्हणून .

४) त्यांची चांगल्या पेक्षा अर्धी किंमत मिळणार होती म्हणून.


५) फळ विक्रेता होता …..

 १) एक गरीब माणूस.

२) एक हुशार व्यक्ती.

३) अत्यंत भोळा माणूस.

४) एक सर्वसाधारण विक्रेता.


 ६) नजर चुकवून म्हणजे…..

१) हात चलाखी करून.

२) फसवणे.

 ३) दृष्टी आड जाणे.

 ४) चकवा देऊन.


 ७) आंबे कशाला काढायला लावलेत? हा आहे…

१)विधान

२) एक विचार.

 ३) प्रश्न.

 ४) शंका.



उत्तरे :. १) 3 , २) 1 , ३) 3 , ४) 3 , ५) 2 ,६) 2 . ७) 3 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...