सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

मराठी आकलन उतारा परिचय क्रमांक 54

 मराठी आकलन उतारा

 परिचय क्रमांक 54


 समुद्रकिनाऱ्यावर वाळूत चालत असताना किंवा तिथेच एखाद्या खडकावर बसून तो बराच वेळ समुद्र लहरींचे निरीक्षण करत होता. प्रत्येक लाट म्हणजे समुद्राचे हातच आहेत. त्या हाताने तो वाळूत एक सारखी चित्रे काढत आहे. आणि नंतर तो आपल्याच हाताने ती पुसूनही टाकतो. लाट मागे जाते, तेव्हा काही काळापर्यंत त्या वाळूत खडकांच्या सभोवती आणि वाळूत रुतलेल्या अनेक लहान लहान दगडांभोवती अनेक तरल अशा अमूर्त दृश्य रचना उमटलेल्या दिसतात. पुढची लाट येते आणि ह्या सर्व रचना पुसून टाकते. दूरवरून एका मागोमाग येणाऱ्या लाटांमध्ये एखादी मोठी लाट सर्व लाटांना ओलांडून फेसाळत पुढे येते. अगदी पुढे आल्यावर मात्र ती वाळूत पदरासारखी पसरते. आणि मागे जाताना पदर आवरून घ्यावा. तशी एकत्रित होते. पुन्हा समुद्राला जाऊन मिळते.


 प्रश्न :


१) समुद्रकाठी वाळूत चित्रे कोण काढत आहे. –

१) वाटसरू.

२) समुद्र निरीक्षक.

३) समुद्री खडक.

४) समुद्री लाटा.


२)) अमूर्त दृश्य रचना उमटलेल्या दिसतात. –

 १)लाटेमध्ये.

 २) समुद्रात.

३) खडकावर.

 ४) समुद्रकिनाऱ्यावर.


३) एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांमुळे-

 १)एक लाट दुसरीचे अस्तित्व जपते.

 २) दुसरी लाट किनाऱ्यावर सामावून जाते.

 ३) दुसरी पहिलीच्या खुणा लूप्त करते.

 ४) लाटेमुळे किनारा नष्ट होत जातो.


 ४) फेसाळत ओलांडून येणारी लाट …..

१) आपले वर्चस्व सिद्ध करते.

 २) सर्वांना घेऊन समुद्रात जाते.

 ३) नवीन रचना तयार करते.

 ४)वाळूत पदर आखडते.


५) ‘तरल’ याचा अर्थ काय?

१) तरंगणारे.

२) काही काळ टिकणारे.

३) अंधुकशा.

४) स्पष्टपणे.



उत्तरे :. १) 4 , २) 4 , ३) 3 , ४) 2 , ५) 3 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...