मराठी भाषा आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक ३४
आपलं इथलं घर किती छान आहे बाबा, दारातच फणसाच झाड आहे. कुईर्यांनी लगडलय नुसतं! आंबा मोहरलाय, जांभळीला देखिल मोहर आलाय. खाली खाडीकाठी टपोऱ्या लाल फुलांनी सावर बहरलीय. परवा सकाळी तोंड धुवायला विहिरीवर गेलो होतो. काय मज्जा! तऱ्हेतऱ्हेची पाखरं तिथं मधासाठी येत असतात. आजोबा त्यांची वेगळी नावे सांगतात. पण दिनुमामानं मला प्राणिसृष्टी हे पुस्तक दिलंय ना. त्यावरून मी त्यांना बरोबर ओळखतो. दयाळ येतो. चंडोल आणि बुलबुल ही असतात. अंगणाच्या कडेला जास्वंदीवर एका बुलबुलाच्या जोडीनं घरट बांधलय. ती जोडीही या गर्दीत येते. भातेडा, पाणमोर, साळुंकी, खंड्या, भारद्वाज, नाचण, पाकोळी, तऱ्हेतऱ्हेची पाखरे! विहिरीजवळच्या माडाच्या झापांना सुगरणीनी घरटी विणलीत. परवा अशाच एका पडलेल्या घरट्याची मी टोपी केली आणि ती घालून एका समारंभात नक्कल केली. खूप मज्जा आली.
प्रश्न :
१) घरट्याची मी टोपी केली. यामध्ये टोपी बनवणारे. –
१) शिंपी , २) आजोबा, ३) सुगरण पक्षी, ४) पाणमोर.
२) सुगरणींनी घरटी विणली होती. –
१) नारळाच्या झावळ्यांना, २) नारळाच्या पेंडीला, ३) सुपारीच्या पानांना, ४)कल्पवृक्षाच्या खोडाला.
३)कुईर्यांनी लगडलय म्हणजे –
१) त्याला आंब्याच्या कोई बांधल्यात.
२) छोटे छोटे फणस लागलेत.
३) कुईर पक्षी दंगा करत आहेत.
४) कुईर पक्षांची घरटी.
४) अंगणाच्या कडेला कोणते झाड आहे. ज्यावर बुलबुलाचे घरटे आहे.-
१) आंबा, २) सावर, ३) फणस, ४) जास्वंद ,
५) दिनुमामाने लेखकास कोणते पुस्तक दिले आहे .-
१) पुष्पसृष्टी, २) प्राणिसृष्टी, ३) वनपक्षी, ४) खाडी सौंदर्य.
६) उताऱ्यात उल्लेख आलेल्या एकूण पक्षी जाती. –
१) नऊ, २) दहा, ३) अकरा, ४) बारा.
७) विविधता या पदासाठी उताऱ्यात आलेला शब्द –
१) झाप, २) सृष्टी, ३) तऱ्हेतऱ्हेचे, ४) बहर .
८) अनुकरण करणे या पदबंधाचा भावार्थ आहे. –
१) बहरणे, २) मजा, ३) विणणे, ४) नक्कल.
९) मधासाठी येत यावरून जाणवते की…,.
१) कुईर, २) आंबे लागलेत, ३) पुष्प वनस्पती आहेत. ४) पानगळ आहे.
उत्तरे : १) 2 , २) 1 , ३) 2 , ४) 4 , ५) 2 , ६) 4 , ७) 3 , ८) 4 , ९) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.