मराठी भाषा आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक ३८
माझ्या बंगल्यात दारांचा तावदानात बऱ्याच वेळा पक्षी घरटी बांधतात. छोटे छोटे पंख फुटल्यावर पक्ष्यांची पिल्ले उडायचा प्रयत्न करु लागली. की कधी कधी जमिनीवर पडत. नीलू त्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी शांतपणे पार पाडी. त्याच्या भीतीने इतर कुठल्याही प्राण्याची त्या चिमुकल्या उडणाऱ्या, पडणाऱ्या जीवांवर दृष्टी टाकण्याची हिंमत होत नसे. कधी कधी तर तो स्वतः त्या छोट्या पिलांना अलगदपणे आपल्या तोंडांत उचलून माझ्याकडे आणत असे. जोपर्यंत शिडी लावून त्यांना सुखरुप घरट्यात ठेवण्याची व्यवस्था होत नसे, तोपर्यंत तो पिल्लांना अलगदपणे आपल्या तोंडांत धरुन उभा राही. किंवा त्यांना माझ्या हातात देऊन वाट पाहण्याच्या पवित्र्यात उभा राही. रोज सकाळी मोर, ससे, कबुतरे यांना दाणापाणी देण्यासाठी मी बाहेर पडले, की थंडी, वारा, पाऊस, कोणताही मौसम असो स्वारी दारात तयार असे. माझ्यासोबत सर्वत्र चक्कर मारत असे. पक्ष्यांच्या खोल्यांना दोन फूट उंचीवर भिंतीवर जाळी लावलेली असे. नीलू न चुकता रोज भिंतीवर दोन पंजे ठेवून उभा राहून आपल्या गोल गोल डोळ्यांनी प्रत्येक खोलीतील पशू, पक्ष्यांचे निरीक्षण करी.
प्रश्न :
१) लेखिका रोज सकाळी जात असे –
१) पक्षांना दाणापाणी देण्यासाठी.
२) फेरफटका मारण्यासाठी.
३) पशूंना निरिक्षणासाठी.
४) पशू - पक्षांना अन्न देण्यासाठी.
२) पक्षी घरटी बांधत असत. –
१) दारांचा फटीत.
२) खिडक्यांच्या फटीत.
३) आड्यावर.
४) दारांच्या तावदानात.
३) पिल्लांचे संरक्षण होत असे. –
१) भिंतीवरील जाळ्यांमुळे.
२) त्यांची घरटी उंच होती.
३) पिल्लांची आई काळजी घेत असे.
४) नीलू त्यांचे रक्षण करी.
४) पक्षांची पिल्ले जमिनीवर पडत –
१) नीलू त्यांना घाबरवत असे.
२) त्यांची आई त्यांना ढकलत असे.
३) पिल्लांचे पंख अपरिपक्व असल्याने.
४) लेखिका त्यांना उडावयास शिकवताना.
५) नीलू आहे एक –
१) पाळीव मांजर.
२) एक कुत्रा.
३) सुंदर ससा.
४) कबुतर.
उत्तरे : १) 4 , २) 4 , ३) 4 , ४) 3 , ५) 2 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.