मराठी भाषा आकलन उतारा परिच्छेद क्रमांक ३९
भारत-पाक युद्धात घडलेली ही घटना युसुफ हा पाक सैनिक जखमी अवस्थेत भारतीय जवानांच्या हाती लागला होता त्याचे इतर दोस्त त्याला तिथेच बेशुद्धावस्थेत टाकून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळून गेले होते हे सारे लक्षात येतात युसुफने पळून जाण्यासाठी अंग हलवले पण त्याच्या अंगात त्राणच उरले नव्हते अगतिकपणे त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, “पाणी” युसुफच्या जवळच हरी नावाचा भारतीय जवान पहारा करत होता त्याच्या कानांवर ते शब्द गेले आणि त्याच्या हृदयाचे पाणी पाणी झाले, कारण त्याच्याजवळ आता फारच थोडे पाणी शिल्लक होते पाण्याचा टँकर येण्यास अजून दोन-तीन तास अवकाश होता. युसुफ पाणी - पाणी. करत तळमळत होता त्याचे ते विव्हळणे ऐकूण हरीचे मन द्रवले हरीने मागचा पुढचा काहीही विचार न करता आपली बाटली त्याच्या तोंडात रिकामी केली युसुफचा तळपणाला जीव थोडा शांत झाला त्याच्या जखमा ठणकत होत्या पण गनिमाने आपणास पाणी कसे काय दिले याचे त्याला आश्चर्य वाटत होते.
प्रश्न : १) युसुफ तळमळत होता……..
१) त्याला अन्न हवे होते.
२) त्याला पाकिस्तानात जावयाचे होते.
३) तो भारतीय जवानांना सापडला होता.
४) त्याचा घसा कोरडा पडला होता.
२) ‘ गनिम’ या शब्दसमूहास म्हटले जात नाही……
१) अरी २) रिपू , ३) दुश्मन, ४) स्नेही.
३) युसुफला आश्चर्य वाटले कारण ……
१) त्याला पाकिस्तान मध्ये पाठवले.
२) पाण्याचा टँकर आला होता.
३) एका भारतीयांनी त्यास मदत केली.
४) पाक सैन्याने त्याचे रक्षण केले.
४) युसुफ भारतीयांना सापडला तेव्हा….
१) तो लढाई करत होता.
२) त्याच्या हृदयाचे पाणी झाले होते.
३) हरि त्याचा मित्र झाला.
४) त्याला शुद्धा नव्हती.
५) ‘ मन द्रवले’ या पदबंधातून व्यक्त होते …..
१) संतापणे.
२) करुणा उत्पन्न होणे.
३) मन पातळ होणे.
४) मन अशांत होणे.
उत्तरे : १) 4 , २) 4 , ३) 3 , ४) 4 , ५) 2 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.