बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 57

 मराठी आकलन उतारा

परिच्छेद क्रमांक 57



 पिकांची कापणी झाली. धान्य बाजारात विकले गेले. दोन्ही मुलांना खूप पैसे मिळाले. ते दोघे आनंदाने घरी आले. हरदयालांना ही गोष्ट समजली. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी दोघांना एके दिवशी बोलावून घेतले, व म्हणाले, “तुमच्या वडिलांनी शेतामध्ये सोने-चांदी पुरून ठेवले नव्हते, ते कष्टातून मिळवायचे होते. तुम्ही शेत खोदून काढले. त्यातून तुम्हाला आज खरे धन मिळाले." अशाप्रकारे कष्ट करा. व धन मिळवा. कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते. कष्ट हेच धन.


 प्रश्न :

१) दोघा मुलांनी शेत खोदले, यामध्ये त्यांचा हेतू होता. ….

१) मेहनत करणे.

२) चांगले पीक काढणे.

३) सोन्या चांदी सारखे शेत बनवणे.

४) त्यांना संपत्ती हवी होती.


२) मुलांद्वारे शेत खणले गेले. कारण….

१) त्यांना संपत्ती हवी होती.

२) त्यांना गुप्तधन हवे होते.

३) त्यांना तेथे संपत्ती आहे. अशी माहिती मिळाली होती.

४) वडिलांनी त्यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधी तेथे पुरला होता.


३) खरे धन आपणास मिळते जेव्हा…..

१) ते आपण इतरांकडून मिळवतो तेव्हा.

२) ते वडिलांनी आपणास वारसा हक्कातून मिळते तेव्हा.

३) मेहनतीतून आपणास प्राप्त होते.

४) आपण ते इतरांना देतो तेव्हा.


४) पिकांची कापणी झाली व त्या दोन भावांना. ….

१) पैसा शेतात सापडला.

२) सोने चांदीने भरलेला हंडा सापडला.

३) खाऱ्या संपत्तीचे मूळ समजले.

४) त्यांच्या अनमोल कष्टाचे धन गवसले.


५) ‘नेहमीच’ याचा अर्थ आहे.

१) सदैव.

२) नशिबात.

३) सतत.

४) सारखे.



उत्तरे :. १) 4 , २) 3 , ३) 3 , ४) 4 , ५) 1 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...