मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 58
कागद गिरण्यांनी बांबू संपवून आमच्या पोटावर पाय आणला आहे. असे म्हणत काल मला बुरुडांनी घेराव घातला. वनाधिकारी सांगतात. बांबूची नासाडी होते. ग्रामस्थांच्या बेशिस्तीनेच, तू याची शहानिशा कर. हवी ती मदत करतो. वन विभागाचे निवृत्त प्रमुख नारायणराव कैकिणी दांडेलीच्या कागद गिरणीचे सल्लागार होते. खुल्या दिलाने मला म्हणाले, “गिरणीतर्फे तुझी सगळी व्यवस्था करतो. आणखी काय हवे?”
कैकीणीच्या जीप मधून दांडेलीच्या जंगलात फिरू लागलो. इकडे तिकडे रानात म्हशी चरत होत्या. मोठ्या चेवाने गिरणीचे कर्मचारी घुसले गुराख्यांना लाठीचे तडाके देऊन रानाबाहेर हाकलले. मी गार झालो. ही तर कायद्याची धडधडीत पायमल्ली करणारी अरेरावी होती. संध्याकाळी पायी पायी एकटाच त्या गुराख्यांच्या वस्तीवर गेलो ते आपापसात ओघवती मराठी बोलत होते. ते रायगडच्या ख्यातनाम हिरकणीच्या समाजातले ‘मस्के धनगर' दहा पिढ्यांपूर्वी कर्नाटकात येऊन स्थायिक झालेले. त्यानंतर पाच वर्षे मनापासून वन प्रदेशात बांबू व्यवस्थापनाचा अभ्यास केला.
प्रश्न :
१) बांबू जंगलातील संपत होते. कारण…..
१) ते खूप उपयुक्त नव्हते.
२) ते कागदासाठी उपयुक्त आहेत.
३) त्यांचा वापर पेपर निर्मितीस केला गेला.
४) त्यांचे आयुष्य संपले होते.
२) ' बुरुड' याचा अर्थ आहे. ….
१) बुरुड नावाच्या प्रदेशातील लोक.
२) घेराव करून आंदोलन करणारे लोक.
३) एक विशिष्ट अधिकारी.
४) बांबू पासून वस्तू बनवणारे लोक.
३) ‘पायमल्ली करणे' या वाक्य संप्रदायाचा अर्थ …..
१) पायाखाली तुडवणे.
२) एखादी गोष्ट जाणून करणे.
३) अवमान करणे.
४) कायदा संरक्षणार्थ केलेली हालचाल.
४) गुराखी लोकांचे आरंभ स्थान होते. ….
१) हिरकणीच्या पायथ्याचे गावातील लोक.
२) रायगड किल्ल्याच्या परिसरातील.
३) राजस्थान राज्यातील.
४) कर्नाटक राज्यातील लोक.
५) उताऱ्यातील निंद्य घटना म्हणजे…..
१) गिरणी कामगारांची कृती.
२) गुराख्यांचे जंगलात जनावरे घालणे.
३) लेखकाचे कैकिणींच्या जीपमधून फिरणे.
४) दांडेली साहेबांनी दिलेले लेखकाला अश्वासन.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 3 , ४) 2 , ५) 1 ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.