मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक 60
लहान शत्रू
एका शेताशेजारी एक अस्वलाचे कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात अस्वलाची आजीही होती. एक दिवस छोट्या अस्वलाने एका शेताचे कुंपण मोडून शेतात प्रवेश केला. आणि तेथे पोळ्यात असलेला मध ते खाऊ लागले. त्याची आजी त्याला ओरडू लागली. अस्वल म्हणाले, “माझी कातडी जाड असल्यामुळे मधमाशांचे काही चालणार नाही.” आजी म्हणाली, “ कधीही शत्रू छोटा आहे म्हणून कमजोर समजू नये.”
तोपर्यंत मधमाशांनी त्याच्या नाकावर आणि डोळ्यांवर वळवळ करून त्याला हैराण केले. अस्वलाला खाज सुटू लागली. अस्वलाने खाजवून नाक आणि डोळे रक्तबंबाळ करवून घेतले. नंतर तो आपल्या कुटुंबात परतल्यानंतर मात्र त्याच्या आजीने त्याची चांगलीच कान उघडनी केली. लहान अस्वलाला आपली चूक कळली.
प्रश्न :
१) आजीकडून अस्वलाला सल्ला मिळाला. कारण…
१) ते चोरटे होते.
२) त्याला मध खायचा होता.
३) ती खूप अनुभवी होती.
४) त्याला मधमाशांकडून धडा शिकवायचा होता.
२) मधमाश्यांनी अस्वलाच्या डोळ्यावर, नाकावर वळवळ केली. कारण…
१) त्यांने मध खाल्ला होता.
२) मधमाशांना आजीने सांगितले होते.
३) त्याची कातडी जाड होती.
४) मधमाशांना त्याला हकलवण्याची युक्ती माहीत होती.
३) अस्वलाचे कुटुंब रहिवास करत होते. …..
१) एका कुंपणात.
२) जंगलात.
३) वावराजवळ.
४) गावाशेजारी.
४)छोटे अस्वल रक्तबंबाळ झाले कारण….
१) ते मध चोरत होते.
२) मधमाश्या त्याला कडकडून चावल्या होत्या.
३) ते घाबरत होते म्हणून .
४) त्याचे मधमाशांविषयीचे अज्ञान.
५) कान उघडणी करणे याचा अर्थ आहे. ….
१) चूक समजणे.
२) कडक शब्दात समज देणे.
३) कान धरून पिळून राग व्यक्त करणे.
४) चुगली चहाडी करणे.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 3 , ४) 4 , ५) 2 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.