मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 59
बालविवाहांना भारतात कायद्यान्वये प्रतिबंध असला तरी अनेक राज्यात बालविवाह कायद्याला वाकुल्या दाखवून सर्रास ते केले जातात. राजस्थानातील एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या शांतीदेवी मेघवाल या मुलीने तिचा अकराव्या महिन्यात झालेला बालविवाह नाकारून जी हिम्मत दाखवली. ती प्रशासनीय आहे. जोधपुर पासून लुनी तालुक्यातील रोहीचा खुर्द गाव अवघे सत्तर किलोमीटर आहे. याच गावातील सोळा वर्षांनी शांतीदेवीचा विवाह ती अकरा वर्षाची असताना सावलाराम नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाबरोबर झाला. शांतीदेवीने धैर्य दाखवून हा बालविवाह नाकारलाच, शिवाय जात पंचायत, घरच्यांच्या दबावाला बळी न पडता या विवाहा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. जात पंचायतीने ठोठावलेला 19 लाखांचा दंड भरायचे नाकारले व त्या विरोधात न्यायालयात ही गेली शांतीदेवी ही नव्या युगाची स्त्री आहे. बालविवाह जाती- पंचायतीच्या अन्याया विरोधात उभे राहण्याचे धाडस करून तिने ते सिद्धही करून दाखविले आहे.
प्रश्न :
१) बालविवाहास प्रतिबंध आहे. कारण …..
१) ती एक योग्य संस्था आहे.
२) कायदा त्याला साथ देतो.
३) तो लहान वयात केला जातो.
४) तो एक गुन्हा आहे.
२) शांतीदेवी मेघवालचा विवाह झाला.जेव्हा ….
१) तिला त्याची जाणीव होती.
२) तो जबरदस्ती केला होता.
३) ती असमजदार असताना.
४) सावळाराम बरोबर लग्न व्हावी ही इच्छा जाणवल्यावर.
३) शांतीदेवी नव्या युगाची स्त्री आहे. कारण….
१) तिचा बालविवाह झाला.
२) सनातनी अयोग्य प्रथांना तिने पायबंध घातला.
३) ती खूप धाडसी होती.
४) तिने पोलिसात तक्रार केली. म्हणून.
४)‘जातपंचायत’ म्हणजे ….
१) अंधश्रद्धा असणारा वर्ग.
२) एक कुटुंब.
३) ग्रामपंचायतीचा एक प्रकार.
४) विशिष्ट वर्गाच्या लोकांचा गट.
५) ‘वाकुल्या दाखवणे' या शब्दबंधाचा येथे अर्थ आहे.
१) न जुमानने.
२) वेडेवाकडे बोलणे.
३) प्रती हल्ला करणे.
४) चिडवणे.
उत्तरे :. १) 3 , २) 3 , ३) 2 , ४) 4 , ५) 1 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.