गुरुवार, ४ जून, २०२६

मराठी आकलन उतारा / परिच्छेद क्रमांक 13

 मराठी आकलन उतारा


परिच्छेद क्रमांक 13



रोगाची चिन्हे रोगजंतूनी शरीराच्या ज्या अवयवाला बाधित केले आहे. त्यावर अवलंबून असतात. उदा. : जेव्हा यकृत बाधित होते, तेव्हा काविळ होते. जेव्हा फुप्फुस बाधित होते तेव्हा खोकला होतो. आणि दम लागतो. या विशिष्ट प्रकारच्या परिणामा व्यतिरिक्त इतरही परिणाम दिसून येतात. हे परिणाम शरीरातील रोगजंतू विरुद्ध लढणाऱ्या प्रतिकार क्षमतेमुळे दिसून येतात. रोग संक्रमणामुळे प्रतिकार क्षमता कार्यान्वित होऊन सैनिक पेशींना रोगजंतू मारण्यासाठी बाधित झालेल्या पेशींकडे पाठवते. यामुळे शरीराचा दाह , सूज, वेदना आणि तापासारखे सर्वसामान्य परिणाम दिसून येतात. कोणता रोग झाला आहे. हे निश्चित ठरवण्यासाठी डॉक्टर रक्त, मूत्र, शौच. यांच्या प्रयोग शालेय चाचण्या किंवा क्ष – किरण चाचणीही घेतात.


प्रश्न :

१) काविळ निर्माण करणारे रोगजंतू परिणाम करतात. –

१) फुफुसावर , २) मूत्राशयावर, ३) यकृतावर, ४) मेंदूवर.


२) ‘ अवयवाला बाधित केलेले आहे.'  या पदबंधाचचा अर्थ आहे. –

१) तो अवयव चांगला आहे. 

२) अवयवात सैनिक पेशी वाढल्या आहेत.

 ३) त्या अवयवावर परिणाम झाला आहे. 

 ४) अवयवाचे वजन वाढले असावे.


३)रोगाचे उच्चाटन करण्यासाठी शरीरात प्रयत्न करते. –

१)डॉक्टर,२) रोगजंतू, ३) सैनिक पेशी, ४) बाधित झालेली पेशी.


४)शरीरावर दाह, वेदना, सूज आणि ताप हा परिणाम झाल्यावर समजावे. –

१) शरीर तंदुरुस्त होत आहे. 

२) शरीराचे वजन वाढत आहे. 

३) शरीर कार्यक्षम होत आहे. 

४) शरीर नादुरुस्त होत आहे.


५) ‘शरीराचा दाह होणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे. –

१) शरीर कठीण होणे,

 २) शरीर नादुरुस्त होते,

 ३) शरीरास वेदना होणे, 

४) शरीरात नाजुकता येणे.



उत्तरे : १) 3 , २) 3 , ३) 3 , ४) 4 , ५) 3 ,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...