मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक १४
भारतीय पशु मुख्यतः दोन जातीत विभागले जातात. ते म्हणजे ‘बॉस इंडिकस’ किंवा गाई आणि ‘ बॉस बबालीज’ म्हणजे म्हशी, दुग्धोत्पादन करणाऱ्या मादींना दूध देणारे (दुधाळ) प्राणी म्हणतात. तसेच शेतीत श्रमिक म्हणून उपयोग होणाऱ्या नर पशूंना ओझी ओढणारे प्राणी म्हणतात.
उच्च उत्पादन देणाऱ्या पशु जातींना अशा प्रकारे वाढविले जाते. की त्यांच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात दूध मिळते. संकरित पशू जाती या उच्च उत्पादन देणाऱ्या व प्रचंड रोग प्रतिकार शक्ती असलेल्या जाती आहेत. भारतीय गाय दररोज अंदाजे पाच ते सहा लिटर दूध देते. तर संकरित जातीची गाय दररोज जवळ जवळ दहा ते बारा लिटर दूध देते. लाल कंधारी , देवणी, खिल्लारी आणि डांगी या जातीच्या महाराष्ट्रातील गायी संकरीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडल्या गेल्या आहेत.
प्रश्न :
१) खालील पैकी कोणती गाय नसावी.-
१) डांगी, २) लाल कंधारी, ३) खिल्लारी, ४) बबालीज,
२) भारतीय पशु बॉस इंडिकस व ……… मध्ये विभागले गेलेत. –
१) शेळी, २) गाई, ३) म्हशी, ४) लाल कंधारी.
३)संकरित पशू जातीमध्ये नाही. –
१) प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती,
२) प्रचंड दुग्ध उत्पादन देण्याची क्षमता,
३) प्रचंड उत्पादन देण्याची क्षमता,
४) रोगाला बळी पडण्याची क्षमता.
४)संकरित गाई देतात भारतीय गाईपेक्षा. –
१) दोन लिटर जादा दूध,
२) दहा ते बारा लिटर जादा दूध,
३) पाच ते सहा लिटर जादा दूध,
४) पाच ते आठ लिटर जादा दूध.
५) खालील आहे एक नरपशु. –
१) गाय, २) म्हैस, ३) बॉस बबालीज’ ४) बैल.
उत्तरे : १) 4, २) 3, ३) 4 , ४) 3 , ५) 4 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.