मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक १२
ऑक्टोपसचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हलगॅरिस आहे. रात्री फिरणारा हा मांसाहारी प्राणी असून तो गोगलगाई सारख्या प्राण्यापासून उत्क्रांत झाला आहे. जगभरात १५० जाती याच्या असून काही उथळ तर काही खोल समुद्रात आढळतात. वाटोळ्या आकाराच्या या प्राण्याचे डोके व धड असे दोन भाग आहेत. तोंडातील चोचीसारखा भाग सोडल्यास संपूर्ण शरीर मऊ असते. डोक्यावर डोळे असतात. दृष्टी तीक्ष्ण असते.
शरीरास वळवळण्यास आठ भुजा असणाऱ्या या कवच नसणाऱ्या प्राण्यास खडकाच्या कपारीत सहज शिरकाव करता येतो. प्रत्येक भुजांवर असलेल्या चुष्काच्या दोन रांगामुळे सरपटत जाणे व भक्ष्य पकडणे सोपे जाते. कासव, मासे, म्हाकुळ, हे कवचधारी प्राणी त्याच्या आहारात असतात. खेकडे हे त्याचे आवडते खाद्य आहे. त्याच्या जबड्याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असल्याने ते भक्ष्य पकडून त्यास चावतात. व लाळ ग्रंथीतून विष सोडतात. भक्ष्य कठीण कवचाचे असेल तर जिभेसारख्या अवयवाने कवच फोडून त्यात विष ओततात.
प्रश्न :
१) ऑक्टोपस रात्री संचार करु शकतो. म्हणून तो आहे.-
१) मऊ अंगाचा प्राणी, २) नऊ भुजांचा प्राणी, ३) निशाचर, ४) उभयचर.
२) ऑक्टोपस किती हातांचा प्राणी आहे. –
१) सात , २) नऊ, ३) पाच , ४) आठ ,
३)जगात किती प्रकारचे ऑक्टोपस आढळतात. –
१) सव्वाशे, २) दीडशे, ३) पावणेदोनशे, ४) शंभर.
४) ऑक्टोपस पाहू शकतो. –
१) फक्त सूर्य प्रकाशात, २) चंद्राच्या प्रकाशात, ३) फक्त दिवसामध्ये, ४) अंधारातही.
५) ऑक्टोपस चालू शकतो. –
१) वळवळ करत, २) सरपटत, ३) दोन पायांवर, ४) डोक्यावर.
६) ऑक्टोपसला खायला आवडते. –
१) मासे, २) कासव, ३) खेकडे, ४) म्हाकुळ.
उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 2 , ४) 4 , ५) 2 , ६) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.