मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक १०
समाज मनावर संस्कार करणारा प्रभावी साहित्य प्रकार कादंबरी. तत्कालीन समाजाचे भाष्य करणारा असा उल्लेख केला जातो. बाबा पद्मनजींची ‘ यमुना पर्यटन ही पहिली मराठी कादंबरी, यातून एका विधवेची व्यथा मांडली आहे. हरीभाऊ आपट्यांनी कादंबरी लेखनाला गती दिली. मानवी स्वभाव वर्णन, चटकदार संवाद, वेधक कथन, घरगुती भाषा, यामुळे हरिभाऊंच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ना. सी. फडके यांनी जादूगार, दौलत, अटकेपार, या सारख्या साठ- सत्तर कादंबऱ्या लिहिल्या. इसवी सन १९३० नंतर वी. स. खांडेकर यांचे कादंबरी लेखन बहरले. कांचनमृग, हृदयाची हाक यांचे लेखन उत्तम आहे. ग. त्र . माडखोलकर यांनी मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, कांता यातून स्त्री जीवनाचे चित्र उभे केले. डॉ. नरेंद्र जाधव यांची आत्मकथात्मक ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे तर खूपच प्रसिद्ध आहे. शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’, दया पवार यांचे ‘ बलुतं ‘ लक्ष्मण माने यांची ‘उपरा’ व लक्ष्मण गायकवाड यांची ‘उचल्या‘ या काही दर्जेदार कादंबऱ्या आहेत.
प्रश्न :
१) कादंबरी आहे एक –
१)कथासंग्रह,२)कथानक,३) गोष्ट,४) समाज मनावर संस्कार करणारे प्रभावी साहित्य.
२) कादंबरी लेखनात आढळत नाही. –
१) चटकदार संवाद,२) वेधक कथन,३) घरगुती भाषा,४) लयबद्ध रचना.
३) ‘आत्मकथात्मक’ या शब्द समूहाचा अर्थ आहे. –
१) आत्म्याविषयी माहिती, २) आत्म्याची कथा, ३) स्वतःच्या जीवनातील अनुभव लेखन, ४) भूतांच्या कथा.
४)’ कांचनमृग’ चे लेखन केले आहे. –
१) विष्णू सखाराम खांडेकर, २) हरीभाऊ आपटे, ३) शंकरराव खरात, ४) लक्ष्मण माने.
५) मराठी भाषेतील पहिल्या कादंबरीतून माहीत होते. –
१) तत्कालीन मानवाचे हाल, २) यमुना नदीचा प्रवास, ३) नवरा मेलेल्या स्त्रीचे दुःख, ४) यमुनेतील रमणीय प्रवास.
उत्तरे : १) 4 , २) 4 , ३) 3 , ४) 1 , ५) 3 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.