मंगळवार, २ जून, २०२६

मराठी आकलन उतारा / परिच्छेद क्रमांक ११

 मराठी आकलन उतारा


परिच्छेद क्रमांक ११


सातवाहन काळात वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती. ब्राह्मण जो पूजाविधी करी, क्षत्रिय जो संरक्षण तर वैश्य व्यापार विनिमय व शूद्र हा गरीब, शोषित या चार वर्णांनचा समावेश होता. कालांतराने वर्ण – व्यवस्थचे रुपांतर जाती व्यवस्थेत व जातीचे पोटजाती व उपजाती मध्ये भेद निर्माण झाले. सातवाहन काळात एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती. लोक शाकाहारी व मांसाहारी अन्न आहारात घेत असत. या काळातील शिल्पकला, चित्रकला व उत्खननातील वस्तूंवरून त्यांची सौंदर्य दृष्टी स्पष्ट होते. यामध्ये बांगड्या, ताईत, मणी, करणभूषणे, पैंजण, अंगठ्या यांचा समावेश होतो. शिकार, द्वंद्व, रथ शर्यत, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, वाद्य, नृत्य, सारीपाट ही मनोरंजनाची साधने होती.


प्रश्न :

१) सातवाहन काळात करमणुकीत नव्हते. –

१) कुस्ती, २) सारीपाट, ३) रथशर्यात, ४) बकऱ्यांची झुंज.


२) परकीय लोकांनी हल्ला केल्यावर वसाहतीचे संरक्षण करत. –

१) ब्राह्मण, २) क्षत्रिय , ३) वैश्य , ४) शूद्र.


३)वर्ण म्हणजे आहे एक –

१) सातवाहन काळातील अक्षर रचना, २) रंग, ३) वर्ग व्यवस्था, ४) अलंकार.


४)खालील पैकी हातात न घातला जाणारा अलंकार कोणता असावा. –

१) बांगड्या , २) ताईत, ३) अंगठी, ४) पैंजण.


५) वरील उताऱ्यात वर्णन आहे. –

१) सातवाहन काळातील राजवटीचे.

२) सातवाहन काळातील समाज रचनेचे,

३) सातवाहन काळातील युद्धाचे,

४) सातवाहन काळातील आर्थिक स्थितीचे.



उत्तरे : १) 4 , २) 2 , ३) 3 , ४) 4 , ५) 2 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...