मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक १५
पक्षांची अंडी व मांस हे प्रथिने आणि जीवनसत्वे यांचा सधन स्तोत्र आहे. जे पक्षी आपल्याला अंडी व मांस देतात. त्यांना पाळतात. कोंबडी व बदकाचे पालन पोषण करण्याला कुकुड पालन म्हणतात. यात कोंबडीचे दोन प्रकारे संगोपन करतात. लेयर्स – अंडी देण्यासाठी आणि बॉयलर्स – मांसासाठी . ज्या कोंबड्या कमी अन्न खाऊन जास्त अंडी देतात. त्यांना लेयर्स म्हहणून निवडतात . पांढरी लेगहॉर्न वर्षाला दोनशे ते अडीचशे अंडी देते. तिला रोज एकशे पंचवीस ग्रॅम पोषक अन्न लागते.
मांसासाठी पाळलेल्या कोंबड्यांना भरपूर प्रमाणात प्रथिने व जीवनसत्वांचे अन्न देतात. परदेशी जातीच्या र्होड आयलंड सारख्या कोंबड्या भारतीय कुकुड पालनात बॉयलर म्हणून वाढवतात. योग्य लसीकरणाद्वारे संबंधित रोगांपासून त्यांचे संरक्षण करतात.
प्रश्न :
१) खालीलपैकी प्रथिने व जीवनसत्वे यांचा सधन स्तोत्र नसावा. –
१) अंडी , २) मांस, ३) पक्षांची विष्टा, ४) पर्याय 1 व 2 बरोबर.
२) र्होड आयर्लंड म्हणजे भारतीय. –
१) बॉयलर , २) लेयर्स, ३) अंडे देणारी कोंबडी, ४) प्रथिने व जीवनसत्वे नसणारी कोंबडी,
३)पांढऱ्या लेगहॉर्नला आठवड्याला खाद्य लागते.-
१) फक्त १२५ ग्रॅम खाद्य, २) ८७५ ग्रॅम खाद्य, ३) फक्त १००० ग्रॅम खाद्य, ४) ७२५ ग्रॅम खाद्य.
४) कोंबडी व बदक घरात पाळले म्हणजे. –
१) पक्षीपालन,२) पशुपालन, ३) कुकुड पालन, ४) कुकुड - बदक पालन.
५) पांढऱ्या लेगहॉर्न पासून दोन वर्षाला मिळतील. –
१) अडीचशे अंडी, २) ३५० अंडी, ३) दोनशे किंवा अडीचशे अंडी, ४) कमाल पाचशे अंडी.
६) उताऱ्यास योग्य शीर्षक द्या. –
१) कुकुड पालन, २) भारतीय पक्षी, ३) अंड्यांचे आगर, ४) लेयर्स व बॉयलर्स.
उत्तरे : १) 3, २) 1 , ३) 2 , ४) 3 , ५) 4 , ६) 1 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.