मराठी आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक २२
अनुवंशिकतेचा अभ्यास सुरू झाल्यानंतर या विषयातले काही आनुवंशिक गुणधर्माचे नमुने शास्त्रज्ञांनी नक्की केले. या टप्प्यानंतर जीवशास्त्राच्या अभ्यासकांनी जनुकाच्या रचनेवर लक्ष केंद्रीत केले होते. इ. स. १९४० चे दशक आणि १९५० च्या दशकाच्या पूर्वार्धात या विषयी केल्या गेलेल्या काही प्रयोगामधून डी. एन. ए. म्हणजे डी ऑक्सिरायबो न्यूलिक आसिडकडे त्याचे लक्ष गेले. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशियन फ्रायडिच माईसचर याने एका वापरलेल्या सर्जिकल बॅन्डेज मधील पू व रक्त यांमधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला. पेशींच्या न्युक्लिअस मध्ये म्हणजे केंद्रकात तो असल्याने त्याला न्यूक्लीन असे नाव दिले गेले. हेच न्युक्लिन पुढे डी एन ए म्हणून ओळखले जाऊ लागले.
यामध्ये कोणत्याही जीवा बद्दल त्याच्या संपूर्ण रचनेला कारणीभूत असणारी माहिती साठवलेली असते. यात गुणसूत्राच्या २३ जोड्या असतात. आणि यात अनुवंशिकता निश्चित करणारी जनुके , गुणसूत्राच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून तर एक मातेकडून येते. मानवी शरीर रचनेचे स्वरूप ठरवण्यासाठी हे महत्वाचे असते. मानवी रुप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्ये, डोळ्यांचा रंग, आकार, रुप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात. या संदर्भात विषाणू आणि बॅक्टेरिया सारख्या सूक्ष्म जीवांवर संशोधन केले जात असतानाच १९५३ मध्ये डी. एन. ए च्या दुपदरी रचनेचा उलगडा झाला.
प्रश्न :
१) जीवशास्त्र अभ्यासकांनी जनुक रचनेवर लक्ष केंद्रित केले. –
१) जेव्हा अनुवंशिकतेचा अभ्यास संपला.
२) आनुवंश नाही हे सिद्ध केले.
३) आनुवंश गुणधर्म नमुने नक्की केले.
४) जेव्हा न्युक्लिन नाव दिले.
२) डी एन ए ला म्हंटले जाते. –
१) डी ऑक्सिरायबो न्यूलिक, २) न्युक्लिइन, ३)डी ऑक्सिरयबोन्यलिक, ४) केंद्रक.
३) गुणसूत्रे ठरवत नाहीत. –
१) मानवी रुप, २) बुद्धिमत्ता, ३) आकार, ४) वायु घेण्याची शरीरातील क्रिया.
४) गुणसूत्राच्या तेवीस जोड्या म्हणजे –
१) पंचेचाळीस गुणसूत्रे, २) तेवीस गुणसूत्रे, ३) सेचाळीस गुणसूत्रे, ४) बावीस गुणसूत्रे जोड्या आणि एक गुणसूत्र.
५) सूक्ष्म जीव म्हणजे –
१) बॅक्टेरिया, २) विषाणू, ३) गुणसूत्रे, ४) पर्याय १ व २ बरोबर.
उत्तरे : १) 3 , २) 1 , ३) 4 , ४) 3 , ५) 4 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.