शनिवार, २० जून, २०२६

मराठी आकलन उतारा , परिच्छेद क्रमांक २३

 मराठी आकलन उतारा


 परिच्छेद क्रमांक २३ अस्वलाचे वर्णन



अस्वलाच्या कुटुंबातील सर्वच प्राणी मोठ्या आकाराचे व अंगावर लोकर असणारे असतात. मोठे डोके व आखूड शेपटी हे वैशिष्ट्य, तो क्रूर असतो अशी ओळख आहे. जगातील आठ प्रजातीच्या अस्वलात ध्रुवीय अस्वल (पोअर बिअर) सर्वात मोठे व क्रूर ओळखले जाते. अस्वलाच्या एका जातीतील प्राणी चष्मा घातल्या सारखे दिसतात. त्यामुळे त्यांना स्पेक्ट्याकल्ड बिअर असे म्हंटले जाते. हिवाळ्यात बहुतेक अस्वले निष्क्रिय असतात. ती सलग अनेक तास झोप घेतात. उन्हाळ्यात ते भरपूर शिकार करून ते आपल्या पोटात साठवतात. या अन्नातून निर्माण झालेली चरबी त्यांना हिवाळ्यात उपयुक्त ठरते. या चरबीच्या आधारावर ते हिवाळ्यात जगतात. अस्वले आपल्या मुलांना हिवाळ्यात जन्म देतात. अमेरिकेतील अस्वले सलग सहा महिने झोपतात. असे आढळले आहे. जायंट पांडा म्हणून ओळखले जाणारे अस्वल पांढऱ्या आणि काळया रंगाचे असते. सन बिअर नावाचे अस्वल आपली २५ सेमी लांब जीभ काढून झाडातील मध चाटत असते. बहुतेक सर्व अस्वले हळू चालत असतात. मात्र वेगाने चालण्याची गरज वाटल्यास आपला वेग वाढवतात. ध्रुवीय प्रदेशी अस्वलांना तेथील वातावरणापासून संरक्षण मिळवण्यासाठी निसर्गाने लोकरीचे संरक्षण बहाल केले आहे.


प्रश्न :

१) डोके व शेपटी बाबत अस्वलाच्या खालील विचार पटतात. –

१) डोके चपटी शेपटी लांब, २) डोके गोल व शेपटी आखूड, ३) मोठे डोके व शेपूट लहान, ४) डोके लहान व शेपूट लहान.


२) ‘ स्पेक्ट्याकल्ड बिअर’ असे अस्वलाला नाव पडले गेले.-

१) ते अस्वल चष्मा घालते, २) त्याचे डोळे तपकिरी आहेत, ३) ते मांसाहारी असावे, ४) त्याच्या डोळ्यांची रचना चेष्म्यासारखी आहे.


३)अस्वलाच्या शरीरातील चरबीचा त्यांना उपयोग होतो , अन्न म्हणून जेव्हा –

१) उष्ण हवामानात, २) जेव्हा प्रदेशात थंड वातावरण असते, ३) जेव्हा अन्न पुष्कळ मिळते, ४) जेव्हा पाऊस पुष्कळ असतो.


४) अमेरिकेतील अस्वले जवळ जवळ …..

१) अर्धे वर्ष निद्रा व अर्धे वर्ष जागृत अवस्थेत असतात.

२) फक्त हिवाळ्यात जागृत अवस्थेत असतात.

३) फक्त उन्हाळ्यात झोपतात.

४) पांढऱ्या व काळया रंगाची असतात.


५) उन्हाळ्यात बहुतेक अस्वले –

१) निष्क्रिय, २) सक्रिय, ३) उदासीन, ४)निद्रिस्त.


उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 2 , ४) 1 , ५) 2 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...