सोमवार, ८ जून, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक १६

 मराठी आकलन उतारा


परिच्छेद क्रमांक १६


मधमाशी या किटकापासून आपल्याला मध मिळतो. मध आहे एक पोषक द्रव्य, मधमाशा शेतात, बागेत, जंगलात उडताना दिसतात. त्यांचे घरटे म्हणजे पोळे किंवा मोहोळ जे झाडावर किंवा झुडूप वा इमारतीवर बांधतात. व्यावसायिक स्तरावर मधमाशी पालन केले जाते. मधमाशा या फुलातील मधुरस गोळा करून त्याचे रूपांतर मधात करतात. त्यापासून मिळणारे मेण हे मेणबत्ती व औषध तयार करण्यासाठी वापरतात. आपल्या देशात मधमाशांची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन दिले जाते. मधमाशी पेटी लावण्यासाठी ‘ खादी ग्रामोद्योग आयोग’ व निरनिराळी कृषी विद्यापीठे मदत करतात. या उद्योगात कमी गुंतवणूक व जास्त उत्पादन होते. मधमाशांच्या ज्या जाती माशीपेटीत वापरतात. त्या भारतीय माशी ( एपिस सेरेना), खडकी माशी ( एपिस डॉरसेटा) आणि लहान माशी (एपिस फ्लोरा) अशा आहेत. मध हा असा पोषक अन्नद्रव्य आहे. जो रक्तात सहज शोषला जातो. आयुर्वेदात तर याचा उपयोग औषध देण्याचे माध्यम म्हणून करतात.


प्रश्न :


१) मध रक्तात सहज शोषला जातो. म्हणून आहे तो एक –

१) विघातक अन्न घटक, २) पोषक अन्नद्रव्य, ३) मधमाशांची संपत्ती, ४) फुलातील एक पातळ पदार्थ,


२) मधमाशी ही शेतकऱ्यासाठी आहे. –

१) एक उपयुक्त कीटक, २) एक उपयुक्त प्राणी, ३) एक उपयुक्त पाखरू, ४) चावणारा एक किडा.


३)पोळे म्हणजे –

१)मधमाशांचे खाद्य, २) मधमाशांचे घर, ३) मधमाशीने टाकलेला एक पदार्थ, ४) भुंग्याचे आलय.


४)’ मध’ तयार करण्यासाठी उपयुक्त कच्चा माल. –

१) फुलांतील मधुसर, २) फुलातील जायांग, ३) फुलातील पुंकेसर, ४) फुलांतील मधुरस.


५) आयुर्वेद आहे एक –

१) भारतीय औषधांचा ग्रंथ, २) रक्तात शोषलेला मध, ३) भारतीय औषध उपचाराची पद्धत, ४) मधमाशीची कलात्मक साहित्य संपदा.


उत्तरे : १) 2 , २) 1 , ३) 2 , ४) 4 , ५) 3 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...