शनिवार, ११ जुलै, २०२६

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २९

 मराठी आकलन उतारा

 परिच्छेद क्रमांक २९



एव्हाना पांडवांची वनवासाची बारा वर्षे संपून अज्ञात वासाच वर्ष जवळ येत होते. म्हणून त्या यक्षाने त्यांना विराट राजाच्या राज्यात जाऊन तिथे आपल्या इच्छेनुसार वेश पालटून राहण्याचा सल्ला दिला. तदनुसार वनवासाची बारा वर्षे लोटल्यानंतर अज्ञातवासाचे एक वर्ष घालवण्यासाठी पांडवानी विराट राज्यात प्रवेश केला. तेथे हलकी कामे करुन ते वर्ष लोटण्याची वाट पाहू लागले. युधिष्ठिर द्युत कुशल ब्राह्मण होऊन विराट राजाकडे राहू लागला. भीमाने आचार्याची भूमिका घेतली. अर्जुन नपुंसक बृहन्नडेच्या छद्म वेशात राजकन्या उत्तरेला नृत्य संगीत शिकवू लागला. नकुल अश्व परीक्षक बनून राजाची अश्वशाला सांभाळू लागला. सम्राज्ञी द्रौपदी सैरंध्रीच्या वेशात विराट राणीच्या अंतपुरात परिचारिका म्हणून नेमली गेली. याप्रमाणे वेशांतर करुन पांडवानी अज्ञातवासाचे वर्ष निर्विघ्न पार पाडले. त्यांना शोधून काढण्यासाठी दुर्योधनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण पांडवांच्या सुदैवाने त्याला त्यात यश आले नाही. अखेरीस दुर्योधनाला त्यांचा पत्ता लागला खरा, पण एक वर्ष संपून गेल्यानंतर

प्रश्न :

१) पांडवांचा सल्लागार होता. –

१) श्रीकृष्ण,२) भीम, ३) यक्ष , ४) विराट राजा.

२) विराट राज्यात राजाकडे स्वयंपाक करण्याचे काम होते. –

१) सहदेवाकडे , २) नकुलाकडे, ३) बृहन्नड्डेकडे, ४) भीमाकडे.

३) विराटाकडे पागेचा व्यवहार कोण पाहत असे.-

१) स्वतःविराट राजा, २) अर्जुनरुपी बृहन्नडा, ३) युधिष्ठिर, ४) नकुल.

४) विराट राजाच्या कन्नेचे नाव होत. –

१) सैरंध्री, २) बृहन्नडा, ३) द्रौपदी, ४) उत्तरा.

५) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे –

१) खूप प्रयत्न करणे, २) प्रयत्न करत कट रचणे, ३) प्रयत्न खुंटणे, ४) परके कष्ट तोडणे.

६) पांडवांचा तपास दुर्योधनास लागला. –

१) अज्ञातवासात, २) १) अज्ञातवासाच्या अखेरीस, ३) १) अज्ञातवास संपताना, ४) १) अज्ञातवास. संपल्यानंतर .

७) बृहन्नडा कोण होती? –

१) अर्जुनशिष्या, २) नृत्यशिक्षक, ३) एक स्त्री, ४) अर्जुनाची छद्म बहिण.




उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 4 , ४) 4 , ५) 1 , ६) 4 , ७) 2 .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.

मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...